• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

July 23, 2026 by admin Leave a Comment


जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढू लागली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षही एकवटू लागले आहेत. एकाच वेळी आंदोलक आणि विरोधक यांनी चारही बाजूंनी हल्लाबोल केल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. आंदोल आणि विरोधकांसोबतच सेलिब्रिटींकडूनही सोशल मीडियावर आवाज उठवला जात आहे. विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र निषेध बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी करत आहेत. मात्र यामुळे काहींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीजा ओकने नुकतीच ही बाजू इन्स्टाग्रामवर दाखवली आहे.

‘चांगलं, वाईट आणि घाणेरडं.. हे तर माझ्या डीएममध्ये (डायरेक्ट मेसेज) येणाऱ्या मेसेजपैकी अर्धेसुद्धा स्क्रीनशॉट्स नाहीत. पण रील्समध्ये फक्त 50 फोटोच समाविष्ट करू शकतो, हे मला आता समजलंय’, असं कॅप्शन देत गिरीजाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिला आलेल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स दाखवले आहेत. सोनम वांगचूक यांचं उपोषण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी एक पोस्ट गिरीजाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली होती. त्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

गिरीजाने शेअर केलेला व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole)

‘तू पण फसली तर आणि हे सिद्ध केलंस की बुद्धिमत्तेसोबतचं सौंदर्य हे फार दुर्मिळ असतं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ही पोस्ट लिहिण्यासाठी तुला किती पैसे मिळाले’, असा सवाल दुसऱ्या युजरने उपस्थित केला आहे. ‘तू खूप समजूतदार कलाकार आहेस आणि तुझ्या क्षेत्रात उत्तम काम करतेयस. कृपया अशा प्रचारकी पोस्टपासून स्वत:ला दूर ठेव’, असाही सल्ला काही नेटकऱ्यांनी दिला आहे. अनेकांनी तिला अनफॉलो करत असल्याचंही म्हटलंय.

गिरीजाची पोस्ट-

‘एक असं आंदोलन आहे, ज्यावर ते लाठीचार्ज करू शकणार नाहीत’, असं म्हणत गिरीजाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अनेकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं नाव समाविष्ट करून SIR यादीत ते कन्फर्म करा, कारण हे कँडल मार्च आणि आंदोलन यांच्याइतकंच महत्त्वाचं असल्याचं तिने म्हटलंय. तिच्या या पोस्टवर काहींनी कमेंट करत ‘तू यात पडू नकोस’ असं म्हटलंय.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
  • त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in