• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तू दुसरीशी लग्न कर.. खचून हिना खानने प्रियकराशी धरलेला हट्ट; त्यागाची केलेली तयारी

August 11, 2026 by admin Leave a Comment


‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने कॅन्सरमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात बराच संघर्ष केला. तरी या संघर्षात तिचा प्रियकर आणि पती रॉकी जयस्वालने तिची खूप साथ दिली. विशेष म्हणजे जेव्हा हिना तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत होती, तेव्हा रॉकीने तिच्याशी लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. हिना खान आणि रॉकी यांची पहिली भेट ‘ये रिश्ता..’च्या सेटवरच झाली होती. जवळपास 13-14 वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं.

हिना आणि रॉकीच्या लग्नाला अनेकांनी पब्लिसिटी स्टंट म्हणत टीकासुद्धा केली होती. त्यावर ती म्हणाली, “लोक काय म्हणतात, याने मला फरक पडत नाही. आम्हाला सत्य माहीत आहे. जर तुम्ही याकडे पब्लिसिटीच्या दृष्टीकोनातून पाहिलात, तर खरं कारणच गायब होतं. खोटेपणावर विश्वास ठेवण्याची लोकांना इतकी सवय झाली आहे की, आम्ही शोसाठी लग्न केलं, असंच त्यांना वाटतंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

नात्यातील कठीण काळ आणि कॅन्सरशी झुंज याविषयी ती पुढे म्हणाली, “आम्ही जी कठीण परिस्थिती पाहिली, त्यातही आमचं नातं कसं टिकून राहिलं? चढउतार, आव्हानं आमच्यासमोरही आले. पण त्यातही आमची स्थिती अशी नव्हती की आम्ही एकमेकांशी भांडू शकू. खऱ्या आयुष्यात आम्ही हा संघर्ष पाहिला आहे. आरोग्याच्या बाबतीत, विशेषकरून माझ्या आणि त्याच्या आईच्या बाबतीत आम्ही असे क्षण पाहिले आहेत की एकेदिवशी मी त्याला दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यास सांगितलं होतं. आता गोष्टी पहिल्यासारख्या राहणार नाही, असं मी त्याला म्हटलं होतं. तरी त्याने प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागले आणि आम्ही ते घेतले.”

“हीच प्रेमाची परीक्षा असते आणि मी त्याची परीक्षा घेत नव्हती. जर त्याने दुसरी व्यक्ती निवडली असती तरी मी त्याच्यासाठी खुशच असते. मी त्याच्यावर इतकं प्रेम करते की त्याच्यासोबत राहण्यापेक्षा तो खुश आहे की नाही हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत हिना खान व्यक्त झाली.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in