
डोक्यावरचे केस, गालावरची दाढी योग्य आणि चांगल्या आकारात असावी, असे तरुणांना वाटते. त्यासाठी अनेक तरुण महागडे प्रोडक्ट वापरतात. सलुनमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. सलूनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर करून तुमच्या दाढीला चांगला आकार दिला जातो.
दाढी चांगली आकर्षक बनवली जाते. परंतु अजूनही अनेककदा सलुनमध्ये दाढी झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरून तुरटी फिरवली जाते. केशकर्तनालयात तुरटी आवर्जून ठेवलेली असते. तुरटी चेहऱ्यावरून का फिरवली जाते, तुरटी फिरवल्याने काय फायदा होतो, ते जाणून घेऊ या..
तुरटी ही सर्वात जुन्या नैसर्गिक अँटिसेप्टिकपैकी एक आहे. तुरटीमुळे जखम स्वच्छ राहते. तसेच रक्तस्त्राव कमी होतो. तुरटीला स्फटिक असेही म्हटले जाते. चरकसंहितेत तुरटीचा उल्लेख आहे, असे सांगितले जाते.
तुरटी वापरल्याने त्यातील पोटॅशियन अॅल्यूमिनिअम सल्फेट या घटकामुळे रक्स्त्राव थांबतो. तसेच त्वच्चा थंड पडण्यास मदत होते. शेव्हिंगुळे त्वचा कोरडी झालेली असते. चेहऱ्यावरून तुरटी फिरवल्यास कोरडेपणा कमी होतो. म्हणूनच अजूनही काही सलुनमध्ये तसेच घरीदेखील शेव्हिंगवेळी तुरटी जरूर वापरली जाते.
टीप- हा लेख इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेला आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी, प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.




Leave a Reply