• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्हीही अतिप्रमाणात मोबाईल वापरता का? मग एकदा बघाच तुकाराम मुंढे काय म्हणाले?

August 2, 2026 by admin Leave a Comment


सध्या राज्यात हॉटेल्स आणि इतर ठिकाणी एफडीएच्या धडाधड धाडी पडत आहेत. यामुळे पुन्हा एकदा तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची जबाबदारी आहे. दरम्यान तुकाराम मुंढे आणखी एका गोष्टीसाठी सतत चर्चेत असतात ते म्हणजे त्यांच्या नेहमी बदल्या होत असतात.  या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आता मोठं विधान केलं आहे. माझ्या बदल्यांबद्दल मी एवढा प्रसिद्ध आहे हे मला आताच माहीत झालं. मी हेल्थ कमिशनर असताना तामगाडगे ट्रस्ट सोबत ओळख होऊन काम करण्याची संधी मिळाली होती,  मात्र 59 व्या दिवशी माझी बदली झाली आणि काम करू शकलो नाही.

20 ते 25 वर्ष काम केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण कठीण होतं, कारण काळ बदलला तेव्हा आम्हाला पुस्तकाचा शोध घ्यावा लागत होता, आता ज्ञान तुमच्या खिशात मोबाईलमध्ये आहे. तंत्रज्ञानात मोठा बदल होत आहे, त्याला आपल्याला अंगीकारावे लागेल पण फक्त अंगिकारून चालणार नाही तर त्याची चाल ओळखून काम करायला पाहिजे. मोबाईलने आपल्याला वापरायचं की आपण मोबाईलला वापरायचं याचा विचार करावा लागणार आहे. त्यात चांगलं वाईट सगळं आहे काय घ्यायचे ते निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असं यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.

मोबाईल रीलच्या माध्यमातून तुम्हाला जे आवडत तेच तुम्हाला पुरवलं जातं, मात्र त्याचा परिणाम काय हे आपल्याला समजून घ्यायचा आहे. टेक्नॉलॉजी , वाईट नाही एआय किंवा इतर टेक्नॉलॉजी वाईट नाही ती चांगली आहे, त्याचा योग्य वापर आपण चांगल्या कामासाठी करावा नाहीतर काही जण त्यातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात.  एआयचा वापर करत असताना आपला विवेक जागृत ठेवा आपला विवेक ढासळू देऊ नका, तेव्हा एआय तुमच्यासाठी वरदान ठरेल.

आपल्याला कौशल्य आधारित शिक्षण घेण्याची गरज आहे , जीवनभर शिक्षण घेता आलं पाहिजे. मशीन मोठी की माणूस मोठा हा विषय नाही, मशीन हा माणूसच ऑपरेट करतो. महासत्ता होण्याकडे आपण जात आहोत, त्यादृष्टीने आपले विचार काय याचा अभ्यास आवश्यक आहे. योग्य  निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात असायला पाहिजे, प्रवाह सोबत वाहत न जाता विचार करून पुढे जायला पाहिजे, असंही यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in