• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तुम्हाला संपवून टाकू…’ सौरव गांगुली आणि त्याच्या कुटुंबियांना धमकी, नेमकं काय झालं?

August 10, 2026 by admin Leave a Comment

माजी टीम इंडियाचा कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका पत्रातून ही धमकी देण्यात आली आहे. गांगुली कुटुंबिय आणि खासगी सहाय्यक यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सौरव गांगुलीच्या कार्यालयात एक पत्र खोललं गेलं. ते इंग्रजीत लिहिलं होतं आणि या पत्रातून क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. कुटुंबियांच्या सूत्रांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून अशी पत्र मिळत आहे. कोणाचा तरी खोडसाळपणा असावा म्हणून सुरूवातीला दुर्लक्ष केलं गेलं. पण पत्र येतच असल्याने मनात शंका वाटू लागली. इतकंच काय तर आता आलेल्या काही पत्रांमध्ये तर अधिक हिंसक भाषा वापरली गेली आहे. त्यामुळे गांगुली कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडे लेखी स्वरूपात तक्रार

गांगुली कुटुंबियांनी ठाकुरपुकुर पोलिस ठाण्यात लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. तसेच राज्य सुरक्षा विभागालाही याबाबतची माहिती दिली गेली आहे. तपासात हे पत्र कुरिअरच्या मध्यमातून सौरव गांगुलीच्या घरी पाठवलं होतं. पाकिटावर अरुण कुमार असं नाव लिहिलं होतं. तसेच बेलघरियाचा राहणारा असल्याचं लिहिलंय. तपासकर्त्यांनी पत्रावर दिलेल्या फोनचा शोध घेतला आहे. ट्रु कॉलरवरही त्या नंबरचं नाव अरुण कुमार असंच आहे. आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. खरंच अरुण कुमार नावाच्या व्यक्तीने असं केलं आहे की त्याच्या नावाचा गैरवापर करून हा खोडसाळपणा केला, याचा तपास केला जात आहे.

यापूर्वीही असं घडलं होतं

सौरव गांगुली याला 2017 मध्ये धमकीचं पत्र आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील एक वृद्ध व्यक्तीला अटक केली होती. तेव्हा सौरव गांगुलीला पत्रातून मिदनापूरच्या विश्वविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेऊ नका असं सांगितलं होतं. सौरभ गांगुलीच्या आईला हे बेनामी पत्र आलं होतं. 2008 मध्येही सौरव गांगुलीला असं धमकीचं पत्र आलं होतं. आता पुन्हा धमकीचं पत्र आल्याने कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सदर पत्र कोणी पाठवलं याचा तपास पोलीस करत आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in