• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमच्या शरीरासाठी सर्वात चांगलं काय? मटण, चिकन की मासे? तुम्हालाही माहिती नसेल हे सत्य

May 25, 2026 by admin Leave a Comment


ज्या लोकांना मांसाहार आवडतो ते लोक प्रामुख्याने मासांहारी पदार्थांमध्ये मटण, चिकन आणि मासे यांचंच जास्त सेवन करतात. भारतामध्ये मटण, चिकन आणि मासे यांना मोठी मागणी असते. जे लोक भारताच्या समुद्र किनारी राहतात, त्यांच्या आहारामध्ये प्रामुख्याने माशांचा अधिक समावेश असतो. मटण असो चिकन असो किंवा मासे हे सर्व प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. केवळ प्रोटीनच नाही तर शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक घटक या पदार्थापासून मिळतात. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, कोणाला चिकन आवडतं, कोणाला मासे आवडतात तर कोणाला मटण आवडतं. मांसाहाराचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की मांसाहारामध्ये तुमच्या शरीराला सर्वात जास्त नुकसानदायक काय ठरू शकतं? मासे, मटण की चिकन?

मटण, चिकन आणि मासे हे तीनही प्रोटीनचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. तुम्ही जर नियमितपणे या तीनही पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला कधीही प्रोटीनची कमतरता जाणवणार नाही. परंतु तुम्ही यातील कोणत्याही पदार्थाचं अति सेवन केलं तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मटणामध्ये सर्वात जास्त सॅच्युरेट फॅट असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्याचसोबत तुम्हाला ब्लड प्रेशरचा देखील धोका असतो.

चिकनमध्ये मटणाच्या तुलनेनं कमी सॅच्युरेट फॅट असतात, त्यामुळे चिकन हे तुमच्या शरीरासाठी आणि वजन नियंत्रणासाठी उत्तम मानलं जातं. परंतु तरी देखील जर तुम्ही अधिक प्रमाणात तळलेलं चिकन खाल्ल तर तुमचं वजन वाढू शकतो, तसेच काहीवेळा बॅक्टेरियल इंफेक्शनचा देखील धोका असतो. मात्र मटणाच्या तुलनेत चिकन हे शरीरासाठी चांगलं मानलं जातं.

अनेक लोकांना मटण आणि चिनक यांच्या तुलनेत मासे खाणे आवडतं. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि लो सॅचुरेटेड फॅटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. माशांची चव देखील रुचकर असते, त्यामुळे मटण आणि चिकनच्या तुलनेत मासे खाणं हे शरिरासाठी उत्तम मानलं जातं. माशांच्या सेवनामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in