• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुफान पाऊस तरी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, रामरक्षा आंदोलनात ठाकरे गरजले, हिंदूंना जागे होण्याची साद!

July 5, 2026 by admin Leave a Comment


UBT Shiv Sena Protest : पक्षात फूट पडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्य पिंजून काढत आहेत. बंड केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांत जाऊन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांत उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला. आता उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथिती आर्थिक गैरव्यवहाराविरोधात उद्धव ठाकरेंनी आता दंड थोपडले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भर पावसात मुंबईच्या दादर परिसरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले. मुंबईत तुफान पाऊस असूनही ठाकरेंच्या या आंदोलनाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.

आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच निषेध केला होता. यावेळी त्यांनी भाजपा, सत्ताधाऱ्यांवर जाहीर आरोप केले होते. तसेच 5 जुलै रोजी मुंबईत रामरक्षा आंदोलनाची हाक दिली होती. सध्या मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई, उपनगरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु भर पावसात ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली होती. विशेष म्हणजे भर पावसात या आंदोनाला उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, नेते सुभाष देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत तसेच इतर नेते उपस्थित होते.

भर पावसात रामरक्षा आरती

लोक रेनकोट, छत्र्या घेऊन लोक आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या होत्या. तसेच गळ्यात भगव्या रंगाचे गमछे घालून आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी गर्दी केली होती. भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनात अगोदर रामरक्षा आरती झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करून समस्त हिंदूंनी जागे राहावे, तुम्ही गाफील राहावं, यासाठी प्रयत्न केला जातोय असं आवाहन केलं.

पाऊस आला तरीही ठाकरेंचे जोरदार भाषण

तसेच, अयोध्येतील राम मंदिरात ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात खुद्द उद्धव ठाकरे हेदेखील चिंब पावसात उभे होते. त्यांचे कपडे पावसाच्या पाण्याने भिजले होते. तरीही त्यांनी आंदोलनात भाग घेऊन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in