• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तिसऱ्या झिम्मा’च्या ट्रिपची जागा ठरली; ओळखू शकलात का तुम्ही? हेमंत ढोमेनं दिली हिंट

June 29, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही वर्षांत दिग्दर्शक हेमंत ढोमेनं अत्यंत उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यामध्ये 2021 मध्ये प्रदर्शित झालेला 'झिम्मा' आणि त्यानंतर 2023 मध्ये आलेला त्याचा दुसरा भाग 'झिम्मा 2' बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले होते. काही दिवसांपूर्वीच हेमंतने या लोकप्रिय फ्रँचाइजीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती.

आता 'झिम्मा 3'विषयी हेमंतने मोठी अपडेट दिली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून त्याने ट्रिपच्या जागेची हिंट दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'आपल्या ‘तिसऱ्या’ झिम्माच्या ट्रिपची जागा ठरली! चला तर मग, बॅगा भरायला घ्या. कारण यावेळी झिम्मा तिसराच आहे,' असं कॅप्शन देत हेमंतने हे फोटो पोस्ट केले आहेत. यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ही जागा कोणती आहे, त्याचाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

अनेकांनी 'झिम्मा 3' विषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. तर या फोटोंवरून ट्रिपची जागा केरळ असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. 'यावेळी झिम्मा 3 फक्त मुलांचा आहे, असं वाटतंय. बरोबर ना', असा प्रश्न एकाने विचारला असता, त्यावर हेमंतने उत्तर दिलं, 'तो आपला आहे, आपलाच राहणार आहे.'

अनेकांनी 'झिम्मा 2' ओटीटीवर दाखवण्याची विनंती केली. त्यावर 'माफ करा, पण याचं उत्तर जियो स्टुडिओज मराठी देऊ शकतात', अशी प्रतिक्रिया हेमंतने दिली आहे. 'झिम्मा'चा पहिला भाग ओटीटीवर उपलब्ध असला तरी दुसरा अद्याप ओटीटीवर आलेला नाही.

केरळ, श्रीलंका, मुन्नार, थायलँड, दक्षिण भारतातील एखादं ठिकाण.. असे अंदाज नेटकऱ्यांनी या फोटोंवरून वर्तवले आहेत. विविध ठिकाणी राहणाऱ्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या सात जणी एकत्र सहलीला जातात आणि त्या सहलीदरम्यान ज्या रंजक, भावूक आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडतात, त्यावर आधारित या चित्रपटांची कथा होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in