
तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं. डीएमके, आणि एडिएमके सारख्या पक्षांना पराभवाची धूळ चारत थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीकेला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, या निवडणुकीमध्ये टीव्हीकेचे 107 आमदार निवडून आले, मात्र तरी देखील थलपती विजय यांचा पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दूरच होता. शेवटी काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर टीव्हीकेनं मतांचं गणित जुळवलं आणि तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. मात्र आता तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वात एका नव्या आघाडीची घोषणा केली आहे. सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्ट्री अलायन्स असं या आघाडीला नाव देण्यात आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply