• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांचा तो एक निर्णय, थेट मुस्लिम देशांमध्ये हाहाकार, दबाव आणत..

May 25, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध संपण्याच्या अत्यंत जवळ आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही देशाकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते. दोन मुद्द्यांमुळे करार होऊ शकत नव्हता, त्यामधूनही मार्ग काढण्यात आल्याचे कळतंय. इराण आणि अमेरिका युद्धाला 3 दिवसांनी तीन महिने पूर्ण होतील. या युद्धाने जग जैरीस आले. ऊर्जेचा तुटवडा असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कितमीमध्ये मोठी वाढ होत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. दोन्ही देश युद्धविरामाच्या कराराला अंतिम स्वरूप देण्याचे काम करत आहेत. यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही केले की, संपूर्ण मुस्लिम देशांची झोपच उडाली. मुस्लिम देशांसमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब देशांवर दबाव वाढवण्यास सुरूवात केली. इस्त्रायलसोबतचे संबंध सर्वसामान्य करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, जॉर्डन, तुर्की आणि इजिप्त या देशांच्या नेत्यांसोबत फोनवरून संवाद साधला. या संवादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही म्हटले की, सर्व मुस्लिम देशांना मोठा धक्काच बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, इराण युद्ध संपल्यानंतर अरब आणि मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत संबंध सामान्य करायचे आहेत.

फक्त हेच नाही तर अब्राहम अकॉर्डमध्ये सामील देखील व्हायचे आहेत. याबाबत बोलताना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, इराणसोबत होत असलेल्या करारावर चर्चा करणे हा उद्देश होता, या कराराबाबत त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायद या सारख्या अरब नेत्यांनी कराराला पाठिंबा दिला आहे.

सर्वांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की, या कराराला आमचा पाठिंबा असून आम्ही तुमच्यासोबत आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चर्चेदरम्यान अचानक एक मुद्दा निघाला. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, ट्रम्प यांनी नेत्यांना सांगितले की ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करणार आहेत. युद्धविरामानंतर मुस्लिम देशांना इस्त्रायलसोबत संबंध सामान्य ठेवावे लागतील, याकरिता डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in