
डेल कंपनीने भारतात त्यांचे नवीन Dell XPS 14 आणि Dell XPS 16 हे दोन्ही प्रीमियम लॅपटॉप लाँच केले आहे. या दोन्ही लॅपटॉपमध्ये लेटेस्ट Intel Core Ultra Series 3 प्रोसेसरसह येतात. कंपनीने हे लॅपटॉप विशेषतः व्यावसायिक, क्रिएटर्स आणि पॉवर युझर्ससाठी डिझाइन केले आहेत. या लॅपटॉपमध्ये आकर्षक OLED डिस्प्ले, AI परफॉर्मन्स, प्रीमियम डिझाइन आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. डेल एक्सपीएस सिरीज नेहमीच त्यांच्या प्रीमियम गुणवत्तेसाठी ओळखली जाते. भारतात त्यांची सुरुवातीची किंमत 2 लाखांपेक्षा जास्त असल्याच सांगण्यात आलं आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉप्सच्या किंमती जाणून घेऊयात.
किंमत आणि ऑफर्स
भारतात Dell XPS 14 ची किंमत 2 लाख 5 हजार 990 रूपयांपासून सुरू होते. तर Dell XPS 16 ची किंमत 2 लाख 78 हजार 550 रूपयांपासून सुरू होते. ग्राहक हे लॅपटॉप डेलच्या अधिकृत वेबसाइट, डेल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि निवडक रिटेल आउटलेट्सवरून खरेदी करू शकतात. लाँच ऑफरमध्ये HDFC, SBI, ICICI आणि इतर बँक कार्ड्सवर 15 हजार रूपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच नो-कॉस्ट EMI चे पर्याय देखील उपलब्ध आहेत. दोन्ही लॅपटॉपमध्ये CNC-मशीन केलेले ॲल्युमिनियम बॉडी, गोरिला ग्लास प्रोटेक्शन आणि अल्ट्रा-थिन डिझाइन आहे.
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस
Dell XPS 14 मध्ये 14-इंचाचा 2.8K OLED डिस्प्ले आहे, तर Dell XPS 16 मध्ये 16-इंचाचा 3.2K OLED टच डिस्प्ले आहे. दोन्ही स्क्रीन्स 120Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतात. इंटेल कोअर अल्ट्रा 7 355 आणि इंटेल कोअर अल्ट्रा X7 358H प्रोसेसर्समुळे याची कामगिरी उत्तम राहते. इंटेल एआय बूस्ट एनपीयूच्या साहाय्याने ते 50 TOPS पर्यंत एआय परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहेत. 32GB LPDDR5x रॅम आणि 1TB एसएसडी स्टोरेजमुळे सुरळीत मल्टीटास्किंग सुनिश्चित होते.
कॅमेरा, बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
दोन्ही लॅपटॉपमध्ये Windows Hello ला सपोर्ट करणारा 8-मेगापिक्सलचा HDR वेबकॅम आहे. ऑडिओसाठी Dolby Atmos आणि Waves MaxxAudio ट्यूनिंगसह क्वाड-स्पीकर सेटअप आहे. डेल XPS 14 आणि XPS 16 या दोन्हीमध्ये 70Wh बॅटरी आणि 100W चार्जर समाविष्ट आहे. तर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये तीन Thunderbolt 4 पोर्ट,Wi-Fi 7 आणि Bluetooth 6.0 यांचा समावेश आहे. बॅकलिट कीबोर्ड, हॅप्टिक ग्लास टचपॅड आणि प्रीमियम बिल्ड त्यांना हाय-एंड लॅपटॉप सेगमेंटला अद्वितीय बनवतात.
Leave a Reply