• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Shirsat : मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी..मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

April 30, 2026 by admin Leave a Comment


“UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले. अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये” अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या. आमचा स्ट्राइक रेट वाढला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. आमच्याकडे रोज एवढे प्रवेश होत आहेत की आम्हाला वेळ देता येत नाही. जे कार्यकर्ते येतात ते स्वतःच्या मर्जीने येतात. त्याचा परिणाम विधान परिषदेत दिसेल. एकनाथ शिंदे यांचा निर्णय घेण्याचा टायमिंग असतो. त्या टायमिंग नुसार ते निर्णय घेतील. बच्चू कडूंच्या बाबतीत 12 वाजेपर्यंत निर्णय होईल” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

“महाविकास आघाडी ही एकत्र नाहीच आणि त्यांच्यात एक वाक्यता कधीच नव्हती. कोणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज यापेक्षा तो पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. काँग्रेसने यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रमाईज केलं. उद्धव ठाकरे विधान परिषदेला असतील तर आम्ही कॉम्प्रमाईज करू असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला सूचना देखील दिली गेली नाही .काँग्रेसचा अपमान करण्याचे काम उबाठाने केले. काही गेलं तरी चालेल. मात्र, आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही. या भूमिकेत कदाचित ते असतील. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढेल असे आत्तातरी वातावरण आहे” असं अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर संजय शिरसाट म्हणाले.

घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत

“उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे. त्यांना सर्व प्रकारची जाणीव आणि माहिती असते. UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले” असं संजय शिरसाट म्हणाले.

उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी

“अंधारे यांना उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी. अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये. आम्ही 42 वर्षापासून काम करतो. एक-दोन दिवसाचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं” असं सुषमा अंधारे यांच्या स्टेटसवर संजय शिरसाट म्हणाले.

मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार

“मराठी शाळा बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. मराठी टिकली पाहिजे, केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ती तशीच राहिली पाहिजे. मराठीच्या स्वाभिमानाला कोणीही ठेस पोहोचवू नये. मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे समजण्याचे काही कारण नाही. मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार आहोत” असं संजय शिरसाट म्हणाले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs SRH : हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरसोबत खूप चुकीचा वागला, मैदानावर असं केलं अपमानित
  • Ashok kharat : लिंगपिसाट खरातकडे सापडला काळा दगड, गूढ वाढलं; दगडावरून कोर्टातही खडाजंगी
  • 76 वर्षीय नाना पाटेकरांचा वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम; फिटनेसच्या धुरंधरांनाही टक्कर
  • LPG Crisis : सिलेंडर घेऊन फ्लॅटचे जिने चढला म्हणून डिलिव्हरी बॉयला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो का? गृहिणींनो तुम्ही तर गंडवला जात नाही ना? नियम काय?
  • Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in