• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अरे सोडा…सुरळी करून… तो प्रश्न विचारताच भडकले राऊत…पाच राज्यातील निवडणुकांवर केले सर्वात मोठे भाष्य

April 30, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Raut on Exit Poll: विधान परिषदेसाठी अंबादास दानवे हे केवळ शिवसेनेचेच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरील सस्पेन्स वाढला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे कानही टोचले आहे. राष्ट्रीय पक्षाची भूमिका आणि त्यावरून वाद होणार नाही याची दक्षता सर्वच पक्षांनी घ्यावी असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे दानवे यांच्या उमेदवारीवरून वाद उफाळतो की त्यावर पडदा पडतो हे लवकरच समोर येईल.

एक्झिट पोल सोडा, ममता दिदी-काँग्रेस जिंकणार

एक्झिट पोलचा आधार घेत भाजप पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार असल्याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक्झिट पोल नाकारला. त्यांनी एक्झिट पोलचा कौल नाकारत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर केरळमध्ये काँग्रेस आघाडी निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला.

मुख्यमंत्र्यांना का पाठवले पत्र?

घोटाळे सर्वत्र सुरू आहेत. पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो सातत्याने शेतकर्‍यांना त्यांच्या न्याय हक्क मिळत नाही. खास करून मी जे आज मुख्यमंत्री यांना कळवले आहे, मला नाशिक मधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिला आहे आणि सहा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे पेमेंट मिळू शकले नाही. मी म्हटलं कारखान्याचे मालकी कोणाकडे आहे ते म्हटले एक नाशिक शिंदे यांच्या नातेवाईकाकडे आहे. त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला. माजी खासदार शिंदे गटातले बँकेकडून गेला आणि गोडसे यांनी कुठल्यातरी पुण्यातल्या एका प्रवीण गावडे अशा त्यांच्या माणसाला चालवायला दिला. त्याच्यांमध्ये शेतकर्‍यांचा काय दोष? शेतकर्‍यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे. त्यांचे पीक दिलेले आहे. कष्ट दिलेले आहेत. कर्ज काढून ऊस पिकवलेला आहे. किमान सहा महिने झाले तरी त्यांना त्यांचे पेमेंट मिळत नसेल तर काय करावे. शेतकर्‍यांनी आत्महत्या करावी का? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

कळला आहे यापैकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी आता तुम्हाला घ्यावी लागेल अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले अष्टलक्ष्मी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा हेमंत गोडसे यांच्या ताब्यात असेल तर हे सत्तेमध्ये लोक आहेत मुख्यमंत्री काय कारवाई करणार का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार आहेत का हा माझा साधा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

बच्चू कडू पक्षप्रवेशावर भाष्य

बच्चू कडू हे पक्ष विलीन करणार आहेत का? त्यांच्या आताच मी एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का कष्ट दुसर्‍या पक्षात विलीन करायला मूर्ख आहे का, असं बच्चू कडू याचं एक स्टेटमेंट आत्ताच मी वाचलं ऐकलं. आता पाहावा लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या निर्णय एक आमदारकीसाठी याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपलेली आहे. बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांना मंत्रीपद दिला होते. ठीक आहे हा त्यांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok kharat : लिंगपिसाट खरातकडे सापडला काळा दगड, गूढ वाढलं; दगडावरून कोर्टातही खडाजंगी
  • 76 वर्षीय नाना पाटेकरांचा वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम; फिटनेसच्या धुरंधरांनाही टक्कर
  • LPG Crisis : सिलेंडर घेऊन फ्लॅटचे जिने चढला म्हणून डिलिव्हरी बॉयला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो का? गृहिणींनो तुम्ही तर गंडवला जात नाही ना? नियम काय?
  • Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल
  • 1 मे पासून या लोकांचे बदलणार पूर्ण जीवन, पौर्णिमेचा थेट तीव्र परिणाम, आयुष्यच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in