• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डीलिमिटेशनचं विधेयकच लोकसभेत नाही, मग कयास कशाला? अमोल कोल्हेंचा थेट सवाल; पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली? थेट सांगितलं…

August 10, 2026 by admin Leave a Comment


संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीत सत्ताधारी खासदारांनंतर शरद पवारांच्या खासदारांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

भेटीत नेमकं काय झालं?

अमोल कोल्हे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांशी 20 मिनिटे चर्चा केली. आमच्या मतदार संघातील मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. नाशिक पुणे रेल्वे आंदोलन बाबत चर्चा केली. इंद्रायणी मेडिसिटी, चाकण MIDC बाबत चर्चा केली . महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत चर्चा केली. शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान यांचा सन्मान केला. कुठलीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही. जे बिल आणखी आलेल नाही त्याबद्दल आधीच कयास बांधणे योग्य नाही. आठही लोकसभा मतदार संघातील मुद्दे आम्ही सगळ्यांनी मांडले. या भेटीचा संबध लगेचच एनडीए मधे जाण्याबाबत लाऊ नये.

” खड्ड्यांचे साम्राज्य, वाहतूक कोंडी”

पुढे ते म्हणाले, निलेश लंके यांनी हेल्थ बाबत अनेक मुद्दे पंतप्रधान यांच्या समोर मांडले. पॉलिटिकल पेक्षा पॉलीसी मेकिंगवर चर्चा जास्त झाली आहे. यापूर्वी आम्ही त्या त्या मंत्र्यांना भेटलो होतो पण तोडगा निघत नव्हता म्हणून योग्य ठिकाणी आम्ही मुद्दा मांडला. PM गतिशक्तीचा मुद्दा महत्वाचा आहे, तो मार्गी लागेल हे अपेक्षित आहे. शरद पवार यांच्या एनर्जीच कौतुक पंतप्रधान यांनी केल. जेंव्हा आम्ही हेल्थ मुद्द्यावर बोलत होतो तेंव्हा पंतप्रधान यांनी कौतुक केल. चाकण MIDCची अवस्था आता अत्यंत वाईट आहे. खड्ड्यांचे साम्राज्य, वाहतूक कोंडी हा अत्यंत मोठा विषय आहे. ५९ कोटी रुपयांच रस्त्याचं टेंडर निघूनही खड्डे बुजवले जात नाहीत. मी राज्य सरकारला वारंवार याबाबत पत्र दिली आहेत. १९ लोकांचे बळी या खड्ड्यांच्यामुले गेले आहेत, याला जबाबदार कोण आहे??

“डी लिमेटिशन संदर्भात चर्चा झाली नाही”

शेवटी अमोल कोल्हे म्हणाले की, कुणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी आमच्या भेटीचे फोटो बघा. शिव, शाहू फुलेंच्या विचरांचं प्रतिक आम्ही दिले. पक्षप्रवेशाच्या विषयावर चर्चा झाली नाही. बिल संदर्भात काही विषय झाला नाही, ते बिल आले नाही. आठही मतदार संघातील प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. केंद्रसरकार विषयासंदर्भात प्रश्न केंद्रकडे नाही तर कुणाकडे मांडायचे. पंतप्रधानानी सर्व मुद्दे समजून घेतले. डी लिमेटिशन संदर्भात चर्चा झाली नाही. राजकीय पेक्षा पॉलिसी संदर्भात चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांना अनेक वेळा हा विषय मांडले. त्यातून तोडगा निघाला नाही म्हणून कुणाकडे तरी हा विषय मांडावा लागेल



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in