• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डीमार्टमध्ये रविवारी या गोष्टी खरेदीसाठी ग्राहकांची होणार तुंबड गर्दी, डीमार्ट संडे सेल, तब्बल 30 टक्के..

July 11, 2026 by admin Leave a Comment


आजकाल सर्वांचाच भर डीमार्टमध्ये खरेदी करण्यावर आहे. डीमार्टमध्ये खरेदी केल्यावर पैशांची मोठी बचत होते. शिवाय डीमार्टकडून विविध ऑफर ठेवल्या जातात. बाय वन गेट वन देखील ऑफर असतात. एका वस्तूवर दुसरी तिच वस्तू फ्री मिळते. महिनाभराचा किराणा भरण्यासाठी लोक जास्त करून डीमार्टमध्येच जातात. 2 ते 3 हजार आरामात वाचतात. शिवाय एकाच छतासाठी आपल्याला सर्वच वस्तू मिळतात आणि तेही अगदी स्वस्तामध्ये. सणवारानिमित्तही डीमार्टकडून विविध ऑफर त्या संबंधित वस्तूंवर ठेवल्या जातात. कधीही डीमार्टमध्ये आपण खरेदीकरिता गेलो तरीही दुनियाभराची गर्दी डीमार्टमध्ये असते. यादरम्यानच जास्तीत जास्त ग्राहकांनी सुट्टीच्या दिवशी खरेदीकरिता डीमार्टमध्ये यावे, याकरिता रविवारी संडे स्पेशन ऑफर डीमार्टकडून ठेवल्या जातात.

जवळपास लोकांना रविवारी सुट्टी असते. 12 जुलै 2026 च्या डीमार्ट संडे स्पेशनसाठी ग्राहकांसाठी काही गोष्टींवर मोठी सवलत दिली जात आहे. घरगुती वापराच्या काही वस्तूंवर तब्बल 30 टक्क्यांपेक्षाही जास्त सवलत आहे. महिन्याच्या सुरूवातीला स्वयंपाक घरात लागणाऱ्या अनेक गोष्टींवर डीमार्टकडून ऑफर दिली जाते. होम डेकोर आणि किचनमध्ये लागणाऱ्या काही गोष्टींवर मोठी ऑफर संडे स्पेशलमध्ये मिळणार आहे.

नॉन स्टिक पॅन, काचेचा बॉटल आणि डब्बे यावर मोठी ऑफर असेल. सध्या डीमार्टमध्ये काचेच्या विविध आकर्षिक बॉटल्स विक्रीसाठी आहेत. त्यावर खास सवलतही देण्यात आली. यासोबतच दही आणि दुधावरही ऑफर आहे. इस्त्री, लहान मुलांचे खेळणे यावर देखील मोठी सवलत बघायला मिळतंय. छत्री, रेनकोडही डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत.

कपड्यांवरही मोठा डिस्काउंट डिमार्टमध्ये सध्या आहे. मूग, मटकी, मसूर डाळ, मसाले यावरही काही प्रमाणात सवलत तुम्हाला रविवारी मिळेल. यासोबतच मॅगी, चिवडा यासारख्या गोष्टींवर एका वर एक फ्रीचीही ऑफर आहे. डीमार्टमध्ये ग्राहकांसाठी अनेक सवलती बघायला मिळत आहेत. ग्राहकांनी जास्तीत जास्त रविवारी खरेदीकरिता यावे, याकरिता डीमार्टकडून यासारख्या ऑफर दिल्या जात आहेत. ही मोठी संधी पैशांची बचत करण्याची ग्राहकांकडे आहे. मग विचार काय करता? धमाकेदार ऑफरसाठी उद्याच जा खरेदीसाठी डिमार्टला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in