
पेट्रोल आणि डिझेल इंजिनमधील फरक : पेट्रोल इंजिनमध्ये इंधन पेटवण्यासाठी स्पार्क प्लगची गरज असते. तर डिझेल इंजिनमध्ये इंधन जास्त दाबामुळे (कंप्रेशन) आपोआप पेटते. बाईकची इंजिने सामान्यतः पेट्रोल इंजिनच्या रचनेनुसार तयार केली जातात.
डिझेल इंजिन जड असते : डिझेल इंजिनमध्ये उच्च दाब सहन करण्यासाठी मजबूत पार्ट्स लागतात. त्यामुळे ते पेट्रोल इंजिनपेक्षा जड असते. बाईक हलकी असणे गरजेचे असल्याने डिझेल इंजिन त्यासाठी योग्य ठरत नाही.
वेग आणि परफॉर्मन्स : पेट्रोल इंजिन जास्त RPM वर काम करते, त्यामुळे बाईकला वेग आणि स्मूथ राइड मिळते. डिझेल इंजिन कमी RPM वर जास्त टॉर्क देते, जे ट्रक किंवा बससाठी योग्य असते, पण बाईकसाठी तितके उपयोगी नसते.
कंपन आणि आवाज : डिझेल इंजिनमध्ये कंपन आणि आवाज अधिक असतो. बाईकमध्ये जास्त कंपन असल्यास राइडिंग अस्वस्थ होऊ शकते आणि नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ शकते.
भारतातील डिझेल बाईक : भारतात 1980 च्या दशकात डिझेल बाईक्स दिसू लागल्या होत्या. 1990 च्या सुरुवातीपासून मधल्या काळात त्या लोकप्रिय झाल्या, पण 2000 नंतर हळूहळू बाजारातून गायब झाल्या.




Leave a Reply