
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामन्यात 2027 मध्ये होणार आहे. आता अंतिम सामन्यांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 9 जून ते 13 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना होईल. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आघाडीवर आहेत. तर भारताची स्थिती करो या मरो यासारखी आहे. (PC-GETTY IMAGES)
इंग्लंडने देखील आपल्या होम शेड्युलची घोषणा केली आहे. यात पाकिस्तानविरुद्ध पाच वनडे, बांगलादेशविरुद्ध एक कसोटी आणि एशेज मालिकेचं वेळापत्रक आहे. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध पाच वनडे आणि 30 टी20 सामनेही खेळणार आहे. (PC-GETTY IMAGES)
एशेज मालिका म्हंटलं तर क्रिकेटचं द्वंद्व.. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येतात. या मालिकेतील पहिला सामना 18 जूनपासून नॉटिंघम येथे होणार आहे. दुसरा कसोटी सामना 30 जूनला लॉर्ड्सवर, तिसरा कसोटी सामना एजबेस्टनमध्ये 8 जुलैला होईल. (PC-GETTY IMAGES)
एशेज मालिकेतील चौथा कसोटी सामना 21 जुलैला खेळला जाईल. हा सामना साउथँप्टनमध्ये होईल. तर पाचवा सामना 29 जुलैला ओव्हल मैदानात खेळला जाईल. (PC-GETTY IMAGES)
इंग्लंड संघाची होम शेड्युलकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण कसोटी संघाचा हेड कोच बदलला जाणार आहे. ब्रँडन मॅकलमला काढण्यात आलं आहे. आता जस्टीन लँगर हेड कोचच्या शर्यतीत आहे. (PC-GETTY IMAGES)




Leave a Reply