• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रेव्हिस आणि विराट कोहलीचा वाद..! हेडच्या पत्नीला पडल्या शिव्या, तिने जे काही घडलं ते असं केलं उघड

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 22 मे रोजी सामना पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. साखळी फेरीत या दोन्ही संघाचा हा शेवटचा सामना होता. पण या सामन्यातील वाद चर्चेत राहिला. या सामन्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाला. या वादाची चर्चा सोशल मीडियावर अजूनही रंगली आहे. असं असताना या वादाची झळ आता ट्रेव्हिस हेडच्या घरापर्यंत पोहोचली आहे. ट्रेव्हिस हेडच्या पत्नीने सांगितलं की, या वादामुळे आम्हाला शिव्या दिल्या जात आहेत. जेसिका हेडच्या मते, भारतीय क्रिकेट चाहते त्यांना ऑनलाईन शिव्या देत आहे. पण ट्रेव्हिस हेडची पत्नी जेसिकाने शिव्या दिल्या जात असल्याची तक्रार आणि व्यथा कोणाकडे मांडली? याचा खुलासा ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार जेसिका हेडने सांगितलं की, घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि सोशल मीडियावर पाहिलं तर शिव्यांची लाखोली वाहिली गेली होती. आमच्यापर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण त्यात मित्र आणि कुटुंबियांनाही त्रास देणं हे काही योग्य नाही. जेसिकाने ऑस्ट्रेलियन मीडियाला सांगितलं की, आता तसंच वाटतं आहे. जेव्हा वर्ल्डकप विजयानंतर शिव्या पडल्या होत्या. ट्रेव्हिस हेडच्या पत्नीने ऑस्ट्रेलियन माध्यमांसमोर केलेला खुलासा हा त्याच वादाचा एक दुष्परिणाम आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Look at Travis Head. when Virat Kohli is saying so many things to him, he still gives a very calm and normal reaction. Many times we have seen that Travis Head believes in answering with his bat, not with his mouth. pic.twitter.com/6OA92WZ5YF

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 22, 2026

नेमका काय वाद झाला?

सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 256 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात धावांचा पाठलाग करातना विराट कोहली 15 धावांवर बाद झाला. या छोट्या खेळीदरम्यान विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली होती. विराट कोहलीच्या आक्रमक शब्दांचा माऱ्यावर उत्तर देण्याऐवजी हेड गप्प उभा होता. पण तेव्हाच या प्रकरणात तेल ओतलं गेलं. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हात मिळवला नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलं. त्यानंतर सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in