• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रकवर Use Dipper at night असं का लिहिलं जातं, कंडोमसोबत आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितीये का?

July 4, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही जेव्हा रस्त्याने प्रवास करत असता, तेव्हा ट्रकवर विविध प्रकारचे स्लोगन तुम्ही पाहिले असतील, जसं की अनेक ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, हॉर्न ओके प्लीज, त्याचप्रमाणे काही ट्रकवर ‘Use Dipper at night’ युज डिप्पर अॅट नाईट असं स्लोगन देखील लिहिलं जातं. हे स्लोगन रस्ते सुरक्षा आणि हेडलाइट यांचा योग्य वापर करण्याशी संबंधित आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? याचा संबंध हा एड्स एचआयव्ही जागृती अभियान आणि एका कंडोम ब्रँन्डशी देखील जोडला गेलेला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की युज डीप्पर अॅट नाईट या स्लोगनचा संबंध हा रस्ते सुरक्षा आणि हेडलाईट यांच्याशी असू शकतो, परंतु कंडोम आणि या स्लोगनचा नेमका काय संबंध?

ट्रकवर युज डिप्पर नाईट असं स्लोगन लिहिण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे रात्रीच्यावेळी वाहन सुरक्षितपणे चालवण्यास चालकाला प्रोत्साहन देणं हा आहे. ट्रक चालकाच्या भाषेत हेडलाइट्सच्या लो बीम सेटिंगला डिप्पर असं म्हटलं जातं. तर हाय बीम सेटिंगला अप्पर असं म्हटलं जातं. रात्रीच्यावेळी डिप्पर लाईट युज केल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकाच्या डोळ्यावर ट्रकचा थेट प्रकाश पडत नाही, त्यामुळे सुरक्षित प्रवास होतो. परंतु जेव्हा तुम्ही रात्रीच्यावेळी अप्पर हेडलाईटचा वापर करतात तेव्हा तो प्रकाश थेट समोरच्या वाहनचालकाच्या डोळ्यावर पडून अपघाताची शक्यता वाढते, त्यामुळे अनेक ट्रकवर तुम्हाला ‘Use Dipper at night’हे स्लोगन पहायला मिळतं.

याचा संबंध कंडोमशी कसा?

2016 मध्ये आरोग्य विभागाने राबवलेल्या एका मोहिमेमुळे या स्लोगनला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. भारताची ट्रक उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोर्टर्सने लांब पल्ल्याच्या ट्रक चालकांमध्ये एड्स आणि सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेशी भागीदारी केली होती. रात्री ट्रक चालवताना डिप्परचा वापर करा ही घोषणा ट्रक चालकांना आधीपासूनच परिचयाची होतीच, त्यानंतर याच मोहिमेचा एक भाग म्हणून डिप्पर नावाचा एक कंडोमचा ब्रांन्ड विकसीत करण्यात आला, तेव्हापासून ‘Use Dipper at night’ या स्लोगनचा संबंध कायम स्वरुपी कंडोमसोबत जोडला गेला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in