• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत मोठा बदल, आता उपांत्य फेरीचं गणित किचकट! आयसीसीने केली घोषणा

July 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं 10वं पर्व होतं. आता 11व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणार आहे. यासाठी आयसीसीने एक मोठा बदल केला आहे. या बदलाची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. 2028 स्पर्धेत आता फक्त दोन संघ सरळ उपांत्य फेरी गाठणार आहे. तर बाकीच्या दोन संघांना एलिमिनेटर सामने खेळून उपांत्य फेरीत जागा मिळवावी लागणार आहे. आयसीसीने माहिती दिली की, टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहे. या स्पर्धेत सुपर 8 च्या सुपर 10 फॉर्मेट असणार आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील 20 पैकी 10 संघ या फेरीत पात्र ठरतील.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असा बदल

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेच्या साखळी फेरीत एकूण 20 संघ असतील. यात फेरीत एकूण 30 सामने खेळले जाणार आहे. तसेच या20 संघांची 5 गटात विभागणी केली जाणार आहे. यापूर्वी चार गट बनवले जात होते. आता सुपर 10 मुळे प्रत्येक गटातील टॉप 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश मिळवतील. सुपर 10 फेरीत एकूण 20 सामने खेळले जाणार आहे. यातही पाच संघांचे दोन गट असतील आणि रॉबिन राउंड पद्धतीने सामने खेळले जातील. या दोन गटातील टॉप असलेले दोन संघ म्हणजेच अव्वल स्थानी असलेले दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. तर उर्वरित दोन संघांना एलिमिनेटर फेरी खेळावी लागणार आहे.

कसे ठरणार उपांत्य फेरीचे उर्वरित दोन संघ?

सुपर 10 मधून दोन गटातील अव्वल संघाची वर्णी थेट उपांत्य फेरीत लागेल. त्यानंतर उर्वरित दोन संघांसाठी चार संघांमध्ये लढत होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ यासाठी सामना करतील. उदाहरण द्यायचं झालं तर, अ गटातील दुसऱ्या स्थानावर असलेला संघ ब गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाशी लढेल. तर ब गटातील दुसऱ्या स्थानावर असलेला संघ अ गटातील तिसर्‍या स्थानावरील संघाशी लढेल. यात विजयी होणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा होतो तसाच होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in