• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने अनेक कलाकारांना धक्का बसला असून आता अभिनेत्री आंचल खुराणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले आहे.

आंचल खुरानाने आपल्या पोस्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील वास्तव मांडताना म्हटले की, प्रेक्षकांना मनोरंजन हवे असते, वाहिन्यांना टीआरपी हवी असते आणि निर्मात्यांना खर्च कमी ठेवायचा असतो. मात्र या सगळ्यात कलाकारांवर कोणत्या प्रकारचा मानसिक आणि व्यावसायिक ताण येतो याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

तिच्या मते, अनेकदा कलाकारांना छोट्या-छोट्या कारणांवरून प्रकल्पातून बाहेर केले जाते. ज्यामध्ये झोपली नाही तर प्रोजेक्टमधून काढून टाकेन. त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड केली जाते. अशा परिस्थितीमुळे कलाकारांवर मोठा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.

ऑडिशन्स, नकार आणि अस्थिर करिअर

आंचलने अभिनय क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणाचाही उल्लेख केला. तिने सांगितले की, अनेक कलाकार दररोज ऑडिशन्स देतात आणि सतत नकाराचा सामना करतात. बाहेरून आकर्षक दिसणाऱ्या या क्षेत्रात करिअरची अनिश्चितता, कामाची अस्थिरता आणि भविष्यासंबंधीची चिंता अनेक कलाकारांना सतावत असते.

तिच्या म्हणण्यानुसार, लोक कलाकारांना ‘मजबूत राहा’ असा सल्ला देतात; मात्र सततच्या संघर्षाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अनेकदा दुर्लक्षित राहतो.

‘कॅमेऱ्यासमोर हसणारा कलाकार आतून तुटलेला असू शकतो’

आंचलने स्वतःच्या अनुभवांचाही उल्लेख केला. तिने सांगितले की, आयुष्यात असा काळ आला होता जेव्हा ती तणाव आणि नैराश्याचा सामना करत होती. अशा वेळी बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी कलाकारांच्या मनात मोठे वादळ सुरू असू शकते.

तिने कलाकारांना आवाहन केले की, कोणतीही परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी टोकाचे पाऊल उचलू नये. गरज वाटल्यास कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तींचा आधार घ्यावा आणि स्वतःला वेळ द्यावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aanchal Khurana (@iaanchalkhurana)

संचिता उगलेच्या मृत्यूची चौकशी सुरू

दरम्यान, संचिता उगलेच्या निधनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते, सहकलाकार आणि संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in