• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जोपर्यंत बॅलेट पेपरवर… संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय

June 6, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची. संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.

या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत अनेक अराजकीय विषयांवर चर्चा केली. साहित्य, संस्कृती आणि पर्यटन याबाबत राज ठाकरे यांना चांगली माहिती असून त्या विषयांवर दोघांमध्ये सविस्तर संवाद झाला.

यावेळी निवडणुकांबाबतही महत्त्वाची चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा आपण उद्धव ठाकरे यांच्यासमोरही मांडला असून त्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. आमदार फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर हा विचार देशभर पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in