• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेन झींसमोर कंगना राणौतला झुकावं लागणार? ‘गटर जनरेशन’ म्हटल्यामुळे वाद विकोपास, पुढे नेमकं होणार तरी काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment


भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी जेन झींचा उल्लेख ‘गटर जनरेशन’ म्हणून केला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. पण ही पहिली वेळ नाही, जेव्हा कंगना त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आता देखील कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आदोलकांना ‘गटर जनरेशन’ म्हटल्यामुळे कंगना यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी देखील होणार आहे. सांगायचं झालं तर, जुन – जुलै महिन्यात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन पुकारलं होतं. ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले.

आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका विशेष न्यायालयाने मंगळवारी खासदार कंगना यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली; एका वकिलाने ही माहिती दिली. प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून जंतरमंतर येथे आंदोलन करणारे जेन झीआणि त्यांच्या आई – वडिलांबाबत राणौवत यांनी केलेल्या कथित टिप्पणीसंदर्भात ही याचिका खासदार/आमदार) न्यायालयात दाखल करण्यात आल्याचं वकिलांनी सांगितलं.

काय म्हणाले वकील…

याचिकाकर्ते आणि अधिवक्ता रमाशंकर शर्मा यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी कोर्टात 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. शर्मा यांनी अभिनेत्री कंगना राणौत यांच्यावर आरोप केले आहेत की, प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात जंतर – मंतर येथे विद्यार्थी आंदोलन करत होते, तेव्हा कंगना यांनी जेन झी आणि त्यांच्या आई – वडिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं,

रमाशंकर शर्मा म्हणाले, ‘भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या विरोधात MP-MLA कोर्टात तक्रार दाखल केली आहे. कंगना, जेन झींना गटर जनरेशन म्हणाल्या. त्यांना असं बोलण्याची सवय आहे. त्यांनी देशातील विद्यार्थ्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या आई – वडिलांना शिव्या दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले. 21 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे…’

सर्वोच्च न्यायालयात जाण्याची योजना

शर्मा यांनी सांगितले की, जर आग्रा न्यायालयाने याचिका फेटाळली, तर ते जेन झी विरोधातील कथित टिप्पणीशी संबंधित प्रकरण पुनर्विलोकन याचिके द्वारे सत्र न्यायालयात नेतील आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागतील. आता याप्रकरणी काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय आता कंगना यांना देखील ‘जेन झीं’पुढे झुकावं लागणारा का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in