• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जुहूत 60 कोटींचं घर, लोणावळ्यात 100 एकरचा फार्महाऊस..; सनी देओलकडे थक्क करणारी मालमत्ता

July 30, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सनी देओलच्या हाती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नुकतंच त्याच्या 'बंटवारा 1947' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यासोबतच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओटीटीवरील त्याचा 'इक्का' हा चित्रपटसुद्धा चर्चेत राहिला. एकापाठोपाठ प्रोजेक्ट करत असतानाच सनी देओलच्या संपत्तीकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलंय.

2023 मध्ये 'गदर 2' सुपरहिट झाल्यापासून सनी देओलच्या संपत्ती बरीच वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनी देओल मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित निवासी भागांपैकी एक असलेल्या मलबार हिल परिसरातील एका आलिशान बंगल्याचा मालक आहे. यात प्रायव्हेट थिएटर जिम स्विमिंग पूल हेलिपॅड अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्यात एकावेळी जवळपास 50 पाहुणे आरामात राहू शकतात.

2023 मध्ये 'गदर 2' सुपरहिट झाल्यापासून सनी देओलच्या संपत्ती बरीच वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित निवासी भागांपैकी एक असलेल्या मलबार हिल परिसरातील एका आलिशान बंगल्याचा मालक आहे. यात प्रायव्हेट थिएटर, जिम, स्विमिंग पूल, हेलिपॅड अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्यात एकावेळी जवळपास 50 पाहुणे आरामात राहू शकतात.

देओल कुटुंबाच्या जुहू इथल्या 'धर्मेंद्र हाऊस'शीही सनी देओलचं नाव जोडलं जातं. देओल कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून याच घरात राहत आहेत. या निवासस्थानाचं आजचं मूल्य हे 55 ते 60 कोटी रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज आहे. या घरात आधुनिक सुखसोयी आणि पारंपरिक इंटेरिअर यांचा सुरेख संगम आढळतो.

मुंबईतल्या ओशिवरा परिसरात सनीच्या मालकीचं 1000 चौरस फुटांचं एक अपार्टमेंट असल्याचंही वृत्त आहे. सुमारे दोन कोटी रुपयांना त्याने हे अपार्टमेंट खरेदी केल्याचं म्हटलं जातं. हे अपार्टमेंट अनेक फिल्म स्टुडिओ आणि प्रॉडक्शन हाऊसच्या जवळ आहे.

मनालीमध्ये सनी देओलचं एक हॉलिडे होम असल्याचं समजतंय. पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला हा व्हिला हिरवाईने आणि निसर्गरम्य परिसराने वेढलेला आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर निवांतपणे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे हॉलिडे होम डिझाइन करण्यात आलं आहे. ही जागा एका खाजगी निवांत ठिकाणी असल्याचं मानलं जातं जिथे देओल कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आराम करू शकते.

मनालीमध्ये सनी देओलचं एक हॉलिडे होम असल्याचं समजतंय. पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला हा व्हिला हिरवाईने आणि निसर्गरम्य परिसराने वेढलेला आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर निवांतपणे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे हॉलिडे होम डिझाइन करण्यात आलं आहे. ही जागा एका खाजगी निवांत ठिकाणी असल्याचं मानलं जातं, जिथे देओल कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आराम करू शकते.

देओल कुटुंबाच्या मालकीचं लोणावळ्यात सुमारे 100 एकरवर पसरलेलं एक विस्तीर्ण फार्महाऊस आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या या फार्महाऊसवर दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी लॉकडाऊनदरम्यान बराच वेळ घालवला होता. हे फार्महाऊस एका धबधब्याजवळ असून तिथे विस्तीर्ण मोकळी जागा आहे. धर्मेंद्र यांच्या अॅक्वा थेरपीसाठी तिथे एक गरम पाण्याचा आऊटडोअर स्विमिंग पूलही बांधण्यात आला होता. भारताशिवाय परदेशातील सनी देओलची संपत्ती आहे. युनायटेड किंग्डममध्ये त्याचं एक घर असल्याचं कळतंय.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in