• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जर्मनीत भारताचा डंका! India Federation of Germany चळवळीने जिंकली मने, परदेशात तुम्हाला मोठी संधी काय?

May 31, 2026 by admin Leave a Comment


India Federation of Germany : जर्मनीत अनेक भारतीय वास्तव्यास आहेत. नोकरी आणि कामाच्या निमित्ताने या देशात त्यांचा वावर आहे. जर्मनीशी गेल्या काही वर्षात भारताचा व्यापार वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पुढारलेल्या या देशात आता भारतीय नागरिकांसाठी हक्काची चळवळ उभी ठाकली आहे. भारतीयांना तिथे या चळवळीमुळे आवाज मिळाला आहे. India Federation of Germany या चळवळीने सर्वांची मनं जिकंली आहे. काय आहे ही चळवळ?

भारतीयांसाठी जर्मनीत ऐतिहासिक क्षण

जर्मनीत आजच्या घडीला ३ लाखांहून अधिक भारतीय राहतात. भारतीय समाजाचे जर्मनीतील जडणघडणीत गेल्या काही वर्षात मोठा हातभार लागला आहे. भारताचे नागरिक या देशात दरवर्षी €१५ अब्ज इतके आर्थिक मूल्य निर्माण करत आहे. हा आकडा फार मोठा आहे. जर्मनीत एकूण १६ राज्य आहेत. त्यात आजच्या घडीला १०० हून अधिक भारतीय संघटना कार्यरत आहेत. पण त्यांचे कार्य हे विखुरलेले होते. त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्य वाढीसाठी जर्मनीत आता India Federation of Germany स्थापना करण्यात आली आहे. ही एक ऐतिहासिक घडामोड आहे. कारण यामुळे देशातील हजारो तरुणांना शिक्षणासाठी आणि कामासाठी एक सूत्रबद्ध आणि सांघिक संघटना मदतीला धावणार आहे.

भारत-जर्मनीतील अर्थपूर्ण संबंधात मोठे योगदान

India Federation of Germany स्थापना झाल्याने जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये धोरणात्मक सहकार्याचे नवीन युग सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर Friedrich Merz यांच्या नेतृत्वात ही संघटना, चळवळ एक मोठा दुवा ठरणार आहे. ती दोन्ही देशातील नागरिकांमध्ये परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचे काम करेल. झपाट्याने बदलत असलेल्या जागतिक अर्थकारणात ही चळवळ जर्मनी आणि भारत यांच्यातील अर्थपूर्ण संबंधात मोठे योगदान देणारी ठरेल.

हा क्षण अत्यंत भावूक

चित्रा विश्वनाथन या परिषदेच्या स्थापनेनंतर भावूक झाल्या. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.२८ वर्षांपूर्वी त्या जर्मनीत दाखल झाल्या होत्या. त्यांनी जर्मनीत शिस्त आणि संधीच्या जोरावर मोठे विश्व निर्माण केले. या प्रवासात त्यांना Manjunath Gubbi यांचे अमूल्य सहकार्य मिळाले. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर्स केले. जर्मन शालेय व्यवस्था आणि मुलांचे संगोपन अशी दोन्ही संस्कृतीतील कसरत लिलया पार केली. त्यांनी या जर्मनी आणि भारतीय संस्कृतीत एक पूल बांधला. त्यांनी भारतातून जर्मनीत येणाऱ्या भारतीयांसाठी काही तरी उद्दत करण्याचा मनाशी संकल्प सोडला आणि ही चळवळ उभी करण्यात स्वतःला झोकून दिले.

आज, Siddharth Mudgal यांच्या नेतृत्वात त्यांनी भारतीय समाज बांधवांसाठी तिथे एक चळवळ उभी केली. त्यांनी एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. ही केवळ एक संघटना नाही तर एक चळवळ आहे. भारतीय जर्मन परिषद ही दोन राष्ट्रांमधील एक मजबूत सेतू आहे. दोन्ही देशातील भविष्यातील सहकार्याचा ही संघटना एकप्रकारे पाया ठरली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, ‘मातोश्री’ बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
  • मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in