• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी, अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूवर संताप..

July 21, 2026 by admin Leave a Comment


डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. काही दिवस शांतता होती, त्यानंतर पुन्हा युद्ध भडकले. अमेरिका सतत इराणवर मोठे हल्ले करत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वेगळ्या संकटात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. होर्मुज खाडी अजून काही दिवस बंद राहिली तर जगात हाहाकर उडू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध शांत होणे आवश्यक आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. परिस्थिती अधिक चिघळत आहे. इराण ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करत आहे. यात अमेरिकेच्या सैन्याचे नुकसान होत आहेत. इराणने केलेल्या हल्ल्यात काही अमेरिकी सैनिक ठार झाले. ज्यावर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड भडकले असून त्यांनी इराणला मोठी धमकी देऊन टाकली.

अमेरिकेने आणखी एका अमेरिकन सैनिकाच्या मृत्यूबाबत माहिती दिली. 20 जुलै 2026 रोजी इराणने जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्रे टाकली. अमेरिकेकडून इराणवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांचा हा सलग 10 दिवस आहे. अमेरिकेच्या सैनिकांच्या हत्येबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकन सैनिकांच्या हत्येबद्दल इराणला त्याची किंमत मोजावी लागेल, त्यांनी एकप्रकारची मोठी धमकीच दिली.

मागच्या आठवड्यांपासून सतत अमेरिकेचे सैनिक मारले जात आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका असुरक्षित दक्षिण मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करताना दोन तेल टँकर्सचा स्फोट झाला. अमेरिकेच्या लष्कराने त्यांना त्या मार्गे जाण्यास सांगितल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी जरी इराणला दिली तरीही त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतात.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्हीकडून मोठे हल्ले केले जात आहेत. युद्धविराम करार अत्यंत जवळ असताना दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच आता युद्ध अधिक भडकल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in