• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातून आली भारतासाठी गुड न्यूज… आता पेट्रोल-डिझेलचे दर धडाधड कोसळणार… जुलैनंतर तेलाच्या किंमती असतील इतक्या…

June 9, 2026 by admin Leave a Comment


भारतच नव्हे तर जगात गेल्या 100 दिवसांपासून कशाची चर्चा होत आहे तर ती म्हणजे कच्च्या तेलाची. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर जगातील बहुतेक देशांमध्ये तेलाचं संकट निर्माण झालं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जे कच्च तेल 70-75 डॉलर बॅलर विकलं जात होतं, ते आज 100-120 डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. तेलाच्या किंमती आणि पुरवठा दोन्हींचं संकट उभं राहिलं आहे. असं असतानाच जगातून एक खूशखबर आली आहे. केवळ भारतासाठीच नव्हे तर तेलाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रत्येक देशासाठी ही आनंदी बातमी मानली जात आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी फिच रेटिंगने तेलाच्या किंमतीवरून अंदाज व्यक्त केला आहे. काय आहे हा अंदाज? त्याचाच घेतलेला हा आढावा.

फिचने कच्च्या तेलाच्या किंमतीबाबतचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. फिचच्या मते 2026मध्ये ब्रेंट क्रूडच्या किमतीत फार मोठा दिलासा मिळणार नाही. तेलाचे दर सरासरी 87 डॉलर प्रति बॅरल राहू शकतात. तर मे पासून जुलैपर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती 100 ते 110 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होईल?

ईराणने जर होर्मुज खुले करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून जहाजांचं दळणवळण सुरू झालं तर तेलांच्या किमती कमी होऊ शकतात. होर्मुज खुले झाल्यास ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तेलाच्या किंमती धडाधड कोसळायला लागतील. त्यामुळे इंधन एकदम स्वस्त होणार आहे.

अशी असेल परिस्थिती

फिचच्या मते 2026मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 87 प्रति डॉलर बॅरलच्या आसपास राहतील. ऑगस्टनंतर कच्च्या तेलाच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येतील. तर सप्टेंबरमध्ये हे दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये होर्मुज खुले झाल्यानंतर तेलाच्या किंमती धाडधाड कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुलैमध्ये होर्मुज खुले झाले तर हा त्यासाठी आधार मानला जात आहे. रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आता ते तेलाचे भाव वाढले आहेत, ते उत्पादनाच्या कमतरतेमुळे नव्हे तर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने वाढले आहेत. रिफायनरी आणि तेल उत्पादनाचं स्थायी नुकसान नाही झालेलं. फिचच्या मते, होर्मुज खुले झाल्यावर सप्टेंबरपासून कच्च्या तेलाची ओव्हर सप्लाय होईल. ओपेक, ओपेक प्लस देशांनी उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

होर्मुज व्हिलन

स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने तेलाचं संकट निर्माण झालं आहे. होर्मुजमळे रोज 2 कोटी बॅरल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगाच्या तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा या मार्गाने जातो. युद्धामुळे होर्मुज बंद आहे. पण तेल भंडारांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. अशा परिस्थितीत, तेल पुरवठा सुरू झाला तर 2026च्या अखेरीपर्यंत तेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…
  • Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
  • प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
  • आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
  • 15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in