
नॉर्वे – नॉर्वे देशात स्थानिकांनाच नव्हे तर परदेशी विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिले जाते. येथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही.
जर्मनी – जर्मनी जगातील अशा देश आहे जेथे शिक्षण मोफत आहे. येथे स्थानिय मुलांसह परदेशी मुलांना देखील मोफत शिक्षण दिले जाते. सरकारी युनिव्हर्सिटीत देखील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
फिनलँड – फिनलँड हा छोटासा युरोपियन देश असून शिक्षणाच्या बाबतीत तो खूपच सजग आहे. हा देश त्यांच्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी मोफत शिक्षण देतो फिनलँडमध्ये विद्यार्थ्यांना बॅचलर्स वा मास्टर्स करण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागत नाही.
स्वीडन – स्वीडनमध्ये केवळ युरोपियन युनियन, युरोपियन इकॉनॉमिक एरिया आणि येथील स्थानिक निवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, परदेशी विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी आकारली जाते.
ऑस्ट्रीया – ऑस्ट्रीयातील मुळे नागरिकांना मोफत शिक्षण दिले जाते. येथे मुळ निवासी कोणतीही डिग्री किंवा कोर्स मोफत शिकू शकतात.
फ्रान्स – फ्रान्सच्या सरकारी विद्यापीठात शिकण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तसेच येथे उच्च शिक्षण देखील मोफत आहे. मात्र, काही विद्यापीठात विद्यार्थ्यांना ट्युशन फी द्यावी लागते.
चेक रिपब्लिक – चेक रिपब्लिक देखील त्यांच्या नागरिकांना मोफत शिक्षण देतो. जर परदेशी विद्यार्थ्यांना मोफत शिकायचे असेल तर चेक भाषेत शिक्षण घ्यावे लागते.
ग्रीस – ग्रीसमध्ये शिक्षण मोफत तर नाही. मात्र कमी पैशात शिकता येते. स्थानिक नागरिकांसह परदेशी विद्यार्थ्यांकडून अत्यंत कमी पैसे आकारले जातात.
स्पेन – जगात मोफत शिक्षण देणाऱ्या देशात स्पेनचा देखील समावेश आहे. येथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. येथील सरकार ८० टक्के फि स्वत:भरते.
इटली – इटलीत देखील शिक्षण मोफत आहे. येथे उच्च शिक्षणासाठी मात्र फी आकारली जाते. मात्र ती खूप कमी असते.









Leave a Reply