• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातले एक अनोखे गाव, सुर्याच्या सर्वात जवळ असूनही थंडीने कुडकुडतात लोक…

July 25, 2026 by admin Leave a Comment


जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून माऊंट एव्हरेस्टचे नाव लोकांच्या तोंडावर येते. सर्वसाधारणपणे एव्हरेस्टचे टोक हेच पृथ्वीवर अंतराळापासून आणि सुर्यापासूनचे सर्वात जवळचे स्थान असे लोकांना वाटत असते. परंतू सत्य त्याहून भिन्न आहे. जगात एक असा पर्वत आहे ज्याचे टोक एव्हरेस्टच्या टोकापासूनही अंतराळाच्या आणि सुर्याच्या सर्वात जवळ आहे. कोणता आहे हा पर्वत जाणून घेऊयात…

दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर येथील माऊंट चिम्बोराजो ( Mount Chimborazo ) हा पर्वत रहस्यमयी आहे. संशोधकांनी यास पृथ्वीवरील सर्वात खास पर्वतापैकी एक मानतात. या पर्वताचे टोक अंतराळ आणि सुर्यापासून पृथ्वीपासूनचे सर्वात जवळचे स्थान आहे. या पर्वताच्या उंच रांगावर लोक आजही राहातात. अनेक गावांची येथे वसती आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात लोक येथे राहात आले आहेत. सुर्याच्या जवळ असूनही येथील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. येथील उंच पर्वतीय रांगा नेहमीच बर्फाने झाकलेल्या असतात.

उंची एव्हरेस्ट पेक्षा जास्त भरते

समुद्र सपाटीपासून माऊंट एव्हरेस्टची उंची सुमारे 8,848 मीटर आहे. तर माऊंट चिम्बोराजोची उंची सुमारे 6,268 मीटर आहे. तरीही चिम्बोराजोचे टोक अंतराळाच्या सर्वात जवळचे टोक मानले जाते. याला कारण पृथ्वीचा आकार आहे. कारण पृथ्वी संपूर्ण वाटोळी नाही तर भूमध्य रेखेच्या ( Equator ) जवळ थोडी फुगलेली आहे. चिम्बोराजो भूमध्य रेखेच्या खूप जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रापासून याची उंची एव्हरेस्ट पेक्षा जास्त भरते. याच कारणाने यास पृथ्वीवरील असा बिंदू मानले जाते. तो अंतराळ आणि सुर्याच्या अत्यंत जवळचा मानला जातो आहे.

ऑक्सीजनची कमतरता

चिम्बोराजो पर्वताची शिखरे वर्षभर बर्फाच्छादित असतात. तरीही 3,500 ते 4,200 मीटर उंचीवर क्वेशुआ आणि पुरुहा आदिवासी समाजाचे लोक पिढ्यान पिढ्या रहात आले आहेत. इतक्या उंचीवर ऑक्सीजनची कमतरता भासते. जे लोक येथे पहिल्यांदा जातात त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. चक्कर येते आणि डोकेदुखी देखील सुरु होते. मात्र येथील लोक येथे अनेक पिढ्यांपासून राहात असल्याने त्यांच्या शरीराला याची सवय झाली आहे.

मातीची घरे,गरम जेवण

चिम्बोराजो पर्वतात राहणारे लोक थंडीपासून वाचण्यासाठी जाड मातीच्या भक्कम भिंती असलेल्या घरात राहातात. त्यांना स्थानिक भाषेत चोजा म्हणतात. या घरांच्या छतावर सुकलेल्या गवताचा मोठा थर रचला जातो. त्यामुळे घराच्या आत उबदार वातावरण तयार होते. जेवणात बटाटा, चीज, एव्हाकाडो पासून बनलेले सुप, गरम जडीबुटी पासून तयार झालेला चहा, मांस प्रमुख रुपाने खातात. येथे मर्यादित शेती होते. त्यामुळे पशुपालनावर बहुतांश लोकांची गुजराण होते.

गरम कपड्यांचा वापर

लामा, अल्पाका आणि विकुना सारखे जनावरे येथे आढळतात. त्यांच्या लोकरी पासून तयार केलेले गरम कपडे, शॉल येथील लोकांचे थंडीपासून रक्षण करते. येथील लोकांसाठी चिम्बोराजो केवळ पर्वत नाही तर आस्थेचा प्रतिक आहे. ते त्याला वडीलांचा मान देतात. ‘हिएलेरोस’ (Hieleros) नावाची प्रथा येथे आधी होती. त्यावेळी लोक गिर्यारोहण करत हा पर्वत चढून तेथील ग्लॅशियर तोडून पर्वताच्या खाली आणून त्याची विक्री करीत होते. आता घरोघरी फ्रिज आल्याने ही प्रथा बंद होत आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in