
जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी काही वाईट सवयी लवकारात लवकर सोडल्या पाहिजे.
सिगारेट, तंबाखूजन्य अंमली पदार्थांचं सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयविकाराची भीती वाढते.
तुम्ही रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर हृदयाचं काम करणे अवघड होईल. नियंत्रित नसलेल्या रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोकची भीती असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी चुकीची जीवनशैली बदलावी लागेल.
काही व्यक्तींना रात्री श्वास घेताना त्रास होता. श्वसनाच्या त्रासामुळे झोप खराब होत नाही, तर यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो.
तुम्हाला मधुमेह झाला नसला तरी रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.




Leave a Reply