• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्…’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्याने पेटला वाद, नेमकं प्रकरण काय?

April 25, 2026 by admin Leave a Comment


आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाच्या वक्तव्याची भर पडली आहे.

काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते. या दरम्यान त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराज जवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असे सांगितले, आणि राजपाट सांभाळण्यास सांगितले. रामदास स्वामींनी सांगितले की, ‘ठीक आहे, आता हे राज्य माझे आहे. शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचे पालन करणं. त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा’” असे विधान केले. याच मुद्द्यांवर वाद पेटला आहे.

या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचं कौतुकही केलं होतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आरडाओरड… किंचाळ्या… काळजाचा थरकाप उडाला, मुलं बुडताना पाहून आई धावली अन्… सोलापुरातील मन सुन्न करणारी घटना
  • इंटिमेट सीन दरम्यान अभिनेत्याचं सुटलं नियंत्रण, कट बोलूनही नाही थांबेना, घाबरुन पळाली अभिनेत्री… कोणी केला मोठा खुलासा?
  • फिल्म इंडस्ट्रीमधील अपशकुनी बंगला, ज्याने घडवले 3 सुपरस्टार पण शेवटी तिघांचं आयुष्य केलं उद्ध्वस्त
  • Amravati | अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हणून पालकांनीच केलं डोकं चक्रावणारं कृत्य
  • Explained : उद्धव ठाकरे मध्यरात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांना का भेटले? त्यामागची राजकीय कारणं, अर्थ काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in