• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद… नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य

August 1, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन देशभरात झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषा वापरण्यात आली. फक्त त्यांच्याबद्दलच नाही तर थेट त्यांच्या दिवंगत आईबद्दलही बोलण्यात आले. ज्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आंदोलनादरम्यान टीका आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. व्हिडीओमध्ये काही गोष्टींवर स्पष्ट बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले. मला शिवीगाळ करण्यात आला, माझ्या दिवंगत आईबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्या सगळ्याचं स्वरूप अत्यंत दुर्दैवी होतं, असे त्यांनी म्हटले. पण मी विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचेही यादरम्यान त्यांनी जाहीर केले.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिशेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे यांनी लिहिले की, आई-वडिलांसारखी माया…चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद…आणि क्षमा करण्याचा मोठेपणा… असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते. आदरणीय पंतप्रधान यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता..

तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता. मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात, पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून, पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे. संवाद, सहभाग आणि विश्वास—याच पायावर सक्षम भारत उभा राहील..

आई-वडिलांसारखी माया…
चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद…
आणि क्षमा करण्याचा मोठेपणा…
असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता, तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता.… https://t.co/50HWjTjgE0

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2026

आता एकनाथ शिंदे यांची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यांची हीच पोस्ट व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट करून विद्यार्थ्यांना संदेश देत आहेत. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in