• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब; कोट्यवधी लोक संकटात?

June 30, 2026 by admin Leave a Comment


China Vs India : चीन हा असा देश आहे जो भारताविरोधात नेहमी काहीरी कुरापती करत असतो. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारत नेहमीच या देशाबाबत सावध भूमिका घेत आलेला आहे. दरम्यान, आता याच चीनने भारताला मोठा धक्का दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतापुढे भविष्यात मोठे संकट उभे राहू शकते. विशेष म्हणजे चीनने केलेल्या या कटकारस्थानाला वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे. चीनने यारलुंग त्सांग नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभा केला आहे.

7.7 अब्ज यूनिट विजेची निर्मिती होणार

चीनच्या या प्रकल्पाला मोटुओ किंवा मेडोग मेगा डॅम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जात आहे. याच प्रकल्पाअंतर्गत चीनने शुक्रवारी दक्षिण-पश्चिमेतील सिचुआन प्रांतातील शुआंगजियांगकोऊ जलविद्युत केंद्राचे पहिला जनरेटिंग युनिट सक्रिय केले आहे. हे युनिट सुरू होताच जगातील सर्वात उंच धरणावर वीजनिर्मिती सुरू झालेली आहे. या जलविद्यूत प्रकल्पातून चीनला साधारण 20 लाख किलोवॅट वीज मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास त्यातून 7.7 अब्ज यूनिट विजेची निर्मिती केली जाईल. शुआंगजियांगकोऊ येथील जलविद्यूत केंद्र 315 मीटर उंचीवर आहे.

धरण बांधण्यासाठी चीनला किती रुपये लागले?

मिळालेल्या माहितीनुसार चीनने जुलै 2025 मध्ये या धरणाची उभारणी सुरू केली होती. या प्रकल्पासाठी 168 अब्ज डॉलर लागण्याचा अंदाज आहे. हे धरण एवढे विशाल आहे की त्यातून अब्जो यूनिट विजेची निर्मिती केली जाईल.

भारतासाठी नेमका काय धोका?

चीनने बांधलेले हे धरण बांगलादेश तसेच भारताची चिंता वाढवू शकते. कारण हे धरण भारतातील कोट्यवधी लोकांच्या अडचणी वाढवू शकते. म्हणूनच चीनच्या या धरणाला भारतात वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे. या धरणामुळे चीन यारलुंग त्सांगपो या नदीवर आपले नियंत्रण मिळू शकतो, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. चीनमधील यारलुंग त्सांगपो ही नदी भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांतून जाते. तसेच बांगलादेशातही ही नदी वाहते. भारतात या नदीला ब्रह्मपुत्रा तरे बांगलादेशात जमुना या नावांनी ओळखले जाते. त्यामुळे या धरणामुळे भारतात येणाऱ्या पाण्यावर चीन नियंत्रण मिळवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rain Update : चक्रीवादळाचं महासंकट, जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज आला!
  • बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले हे 5 चित्रपट, कथेमुळे आजही प्रेक्षकांमध्ये आहेत सुपरहिट, लोक आवडीने बघतात
  • मोठी बातमी! दोन महिन्यात सहावा धक्का, या नेत्याची आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी
  • महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
  • WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in