• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीडचीड होतेय, राग येतोय, संकटाला कसे तोंड द्यावे, चाणक्य नीतीचा उपदेश कधीच विसरू नका!

May 25, 2026 by admin Leave a Comment


आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अनेकदा असे प्रसंग येतात की तेव्हा आपण हतबल होऊन जातो. काही वेळा तर चीडचीडही होते. अशा वेळी तुम्हाला चाणक्य नीतीमधील शिकवण मदतीला येऊ शकते. ही शिकवण काय आहे, ते जाणून घेऊ या…

चीडचीड, राग-राग केल्यावर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही. उलट होत असलेले काम बिघडून जाते. त्यामुळे शांततेत प्रत्येक काम करणे गरजेचे असते. चाणक्य नीतीनुसार समोर आलेल्या पेचप्रसंगांना धीर धरून सामोरे जावे. म्हणजेच समोरचे संकट पेलण्याची हिंमत तयार होते.

चीडचीड, राग-राग होत असेल तर तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक कठोर होणे गरजेचे आहे. एखादे संकट समोर आले असेल तर लगेच मन घट्ट करा. भावनांना आवर घालून आलेल्या संकटावर विजय कसा मिळवायचा याचा शोध घ्या. असे केल्यास तुम्हाला संकटात कठीण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य विकसित होते.

अनेकदा लोकांनी व्यक्त केलेल्या मताचा अधिक विचार करून आपण चीडचीड करायला लागतो. त्यामुळे लोकांच्या मतांना जास्त किंमत देऊ नये. उलट तुम्हाला नेमके काय वाटते? याचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा, असे चाणक्य नीती सांगते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in