• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चार वेळा साईबाबांची, आई भवानीची आणि मुलांची शपथ घेतली अन्… संजय राऊत यांचा खुलासा…

June 17, 2026 by admin Leave a Comment


एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. काल तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये जात थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे 6 खासदार दिल्लीत 5 स्टार हॉटेलमध्ये आहेत. यादरम्यानच दिल्लीत संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षफुटीच्या चर्चांवरच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. यादरम्यान काही खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. ठाकरे गटाचे 6 खासदार 19 जूनला एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काही खासदारांनी साईबाबा, आई भवानी, आई-वडील आणि मुलांच्या शपथ घेतल्याचा दावा, संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी म्हटले की, रविवारी बैठक झाली. चार खासदार उपस्थित होते. संजय पाटील होते, राजाभाऊ होते. पाच लोकं व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे हजेरी लावली. त्यातील एका खासदाराने चार वेळा साईबाबांची शपथ घेतली. आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगितलं. तीन मिनिटात चारवेळा शपथ घेतली. बायको आजारी आहे. साईबाबांची शपथ, तुमच्यासोबत आहे, साईबांबाची शपथ, उद्या तुम्हाला भेटायला येतो साईबाबांची शपथ, मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहील साईबाबांची शपथ.

इतका साईबाबा आठवला. कुणी आईची शपथ घेतली. कुणी मुलाची शपथ घेतली. कुणी बाळासाहेबांची शपथ घेतली. ज्यांचा संबंध नव्हता, तरी शपथ घेतली. त्यावेळी विश्वास ठेवणं अनिवार्य असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी थेट म्हटले की, राजीनामे फेका. यादरम्यान भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. दबाव कशाप्रकारे येतात हे सांगताना संजय राऊत दिसले.

शिवसेना आमची आई आहे. शिवसेनेशी बेईमानी करणार असेल तर त्यांना सोडणार नाही. जे करायचं ते करा. मोदी किंवा शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आले नाही. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. गद्दारी कराल तर याद राखा. काल रात्री 15 कोटी मिळाले. त्यानंतर चार्टेड फ्लॅटने नांदेड आणि पुण्यातून दिल्लीत आले, असे त्यांनी म्हटले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in