• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

July 19, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा असे होते की आपल्याला कुठे तरी जायचे असते आणि अचानक ट्रेनने प्रवास करावा लागतो. कधी अचानक फिरायला जायचे असते तर कधी अचानक कामानिमित्त इतर जिल्ह्यात म्हणा किंवा राज्यात जाण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत तिकिट मिळवणे खूप कठीण होते. सणाच्या सीझनमध्ये आणि लग्नांच्या काळात तर तिकिट मिळणे अजूनही जास्त अवघड होते. कधीकधी तिकिट न मिळाल्यामुळे अचानक प्लॅन रद्द करावा लागतो. आपल्याला वाटते की आता वेळ निघून गेली, तत्काल तिकिटची संधीही संपली आणि चार्ट तयार झाल्यानंतर तर काहीही आशा नाही. पण अनेकदा असे नसते. काही ट्रेनमध्ये शेवटच्या क्षणीही आपल्याला कन्फर्म तिकिट मिळू शकते.

१५ मिनिटेआधीही बुक होणार तिकिट

रेल्वेने तिकिटसंबंधी अनेक नियम बनवले आहेत. त्यानुसार पहिला रिझर्वेशन चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्ही तिकिट बुक करू शकता. शेवटच्या वेळी जर आपण सीटची तपासणी केली तर रिक्त जागा दिसू शकते. अशा वेळी Current Availability अंतर्गत तिकिट बुक करता येते. या सुविधेद्वारे ट्रेन सुटण्याच्या १५ मिनिटांआधीपर्यंत तिकिट बुक करणे शक्य आहे.

वाचा: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच

शेवटच्या क्षणी तिकिट कसे मिळवावे यासाठी आपल्याला आपल्या प्रवासाच्या स्टेशनवरून जाणाऱ्या ट्रेनची माहिती ठेवावी लागते. अनेकदा शेवटच्या वेळी तिकिट रद्द झाल्याने चार्ट तयार झाल्यानंतरही सीट खाली दिसते. अशा वेळी आपण IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन Current Availability या पर्यायात तपासणी करू शकता. जशी सीट उपलब्ध दिसेल तसे लगेच टिकिट बुक करा. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. कधीकधी सामान्य भाड्यापेक्षा कमी किंमतीत किंवा सवलतीसह तिकिट मिळते. आपण स्टेशनवरील तिकिट काउंटरवर जाऊनही Current Availability तपासून तिकिट बुक करू शकता.

रेल्वेच्या नियमांनुसार उपलब्ध सीट आपल्याला अलॉट होणार

जर आपण इमर्जन्सी प्रवास करत असाल आणि आपल्याकडे वेटिंग तिकिट असेल तर ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या टीटीईशी सीटसाठी बोलणे देखील फायद्याचे ठरू शकते. कधीकधी तिकिट बुक असूनही प्रवासी आपल्या सीटवर येत नाहीत. प्लॅन अचानक रद्द झाल्याने किंवा ट्रेन चुकल्यामुळे असे घडते. अशा परिस्थितीत टीटीई रेल्वेच्या नियमांनुसार उपलब्ध सीट आपल्याला अलॉट करू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता या चलनी नोटा बदलणार, RBI चा सर्वात मोठा निर्णय, कारण काय?
  • राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
  • मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
  • चहात बुडवताच बिस्कीट का तुटते ? या मागे नेमके काय शास्रीय कारण असते ? एकदा वाचाच…
  • वयाच्या 40व्या वर्षी कश्मीरा होणार आई; खास अंदाजात दिली गुड न्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in