
चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय भारतात अनेकांची सकाळ होत नाही. सकाळी आणि सायंकाळी चहाचे गॅसवर आधन ठेवले की चहाचा कडक सुंगध येताच नुसत्या सुंगधानेच अनेकांची झोप उडून तरतरी येते.
अनेकदा मित्रांसोबत गप्पा मारताना चहात बिस्कीट बुडवून त्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, बिस्कीट चहाच बुडवताच ते खाण्याआधीच तुटल्याने अनेकांचा हिरमोड होतो.
अनेकदा बिस्कीट तोंडाजवळ नेतानाच नेमके तुटल्याने ते नेमके चहात पडते आणि चहाचे थेंब आपल्या चेहऱ्यावर उडतात. मात्र, चहात बिस्कीट बुडवताच ते नेहमी का तुटते या मागे काय आहे नेमके सायन्स ते वाचूयात
चहा पिताना सोबत बिस्कीटाचा आस्वाद घेताना हे बिस्कीट अनेकदा तोंडात पोहचण्याच्या आधी ते मधूनच तुटते. या मागे नेमके सायन्स तरी काय आहे हे वाचूयात…
सोप्या भाषेत पाहूयात चहात बिस्कीट का तुटते ? जेव्हा तुम्ही चहात बिस्कीट टाकता तेव्हा विज्ञानातील कॅपिलरी एक्शन ताम करु लागते. या प्रक्रियेत तरल पदार्थ कोणत्याही बाहेरील दबावाशिवाय आपोआप पदार्थाच्या छीद्रातून वेगाने आत जातो. चहा वेगाने बिस्कीटाच्या छोट्या -छोट्या छींद्रात भरला जातो.
बिस्कीटाचे आतून कमजोर होणे – जसा गरम चहा बिस्कीटाच्या आत शिरु लागतो. तसेच बिस्कीटाला एकसंघ जोडून राखणारा वस्तू कमजोर होतात. बिस्किटातील असलेला स्टार्च आणि साखर त्याला कडक ठेवत असतात.
परंतू चहात ते मिसळताच ते विरघळू लागते. आणि गरम चहा देखील तिचा फोर्स दाखवते. गरम चहाने वेगाने बिस्कीटाच्या आत जातो आणि काही सेकंदातच त्याला आतून कमजोर करते.यामुळे बिस्कीट जड होते आणि ढीले पडते.त्यामुळे तुटून चहात कोसळते.






Leave a Reply