• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं

July 16, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो, घराची स्वच्छता करत असताना आपल्याला आपण कधीकाळी चुकीने एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू आणि कालांतराने आपण ती विसरून गेलेलो असतो, अशी एखादी गोष्ट सापडते. ज्यामध्ये जुने नाणी, काही महत्त्वाच्या गोष्ट अशा अनेक गोष्टी असू शकतात. परंतु घराची स्वच्छता करत असताना एका कुटुंबाला जे सापडलं त्या गोष्टीमुळे हे अख्खं कुटुंब एका रात्रीत श्रीमंत झालं आहे. सुरुवातीला तर या कुटुंबाचा विश्वासही बसला नाही, परंतु त्यांच्या हाती मोठा जॅकपॉट लागला होता.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घराची स्वच्छता सुरू असताना एका कुटुंबातील व्यक्तीच्या हाती त्याच्या आजोबांचं तब्बल तीस वर्षांपूर्वीचं एक बँक पासबुक हाती लागलं आहे. पासबुक सापडल्यानंतर त्या व्यक्तीने मोठ्या उत्सुकतेने ते पासबुक उघडून पाहिलं, त्या पासबुकवरची रक्कम बघून अख्ख्या कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे. या पासबुकवर एक लाख रुपये एसबीआयच्या बँक खात्यात जमा असल्याचं दिसून येत होतं. तीस वर्षांपूर्वीचे एक लाख रुपये म्हणजे आताच्या काळात त्याची किंमत किती असेल याचा विचार करा. जेव्हा कुटुंबातील व्यक्तीने हे पासबुक पूर्ण ओपन केलं तेव्हा त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला कारण या व्यक्तीच्या आजोबाच्या एसबीआयच्या बँकेत केवळ एक लाख रुपयेच नाही तर लाखो रुपये जमा होते.

 

A guy found a 20-24 year old SBI passbook while cleaning his house.

and what he discovered left his entire family shocked.

When he showed the passbook
to his father,

he learned that it belonged to his late grandfather.

His father admitted they had always believed the… pic.twitter.com/VZqk4C3JJQ

— Pooja. (@poojaofficial5) July 15, 2026

हा सर्व किस्सा या व्यक्तीने ट्विट केला आहे. तसेच जुन्या बंद झालेल्या बँक खात्यातील पैसे आम्ही काढू शकतो का असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. त्यावर अनेकांनी या व्यक्तीला सल्ला दिल्याचं दिसून येत आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार तुम्ही तुमच्या विसरून गेलेल्या एखाद्या खात्यामधून पैसे काढू शकतात, जर ते खातं तुमच्या एखाद्या मृत नातेवाईकाचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेकडे मृतपत्र सादर करावं लागेल तसेच आपणच त्या बँक खात्याचे अधिकृत वारस आहोत, हे सिद्ध करणारे पुरावेही जमा करावे लागतील, त्यानंतर ती रक्कम तुम्हाला मिळू शकेल असा सल्ला या व्यक्तीला काही युझर्सने दिला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • iQOO ने भारतात लाँच केला 7050 mAh बॅटरी असलेला नवीन 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता
  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in