• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घटस्फोट प्रकरणी वाद, नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय

June 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या हक्कांसाठी लढत आहे… अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटांमुळे चर्चेत आहे. नवरा पीटर हाग याच्यासोबत घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडी प्रकरणी अभिनेत्री लढत आहे. याच दरम्यान, सेलिना हिच्या नवऱ्याने आणि सासरे वोल्फगँग हाग यांनी अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यावर संताप व्यक्त करत सेलिना हिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सेलिना म्हणाली, ती कोणत्याही कायदेशीर धमक्या किंवा दबावाला बळी पडणार नाही. ती तिच्या मुलांसाठी, तिच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढत राहील.

शुक्रवारी सेलिना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे की, नवरा आणि सासऱ्यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिलं आहे. त्या नोटीसमध्ये अभिनेत्रीवर बदनामीचा आरोप करण्यात आला आहे आणि कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली आहे, मात्र, सेलिना म्हणाली की, तिने तिच्या वकिलांमार्फत या नोटिसांना उत्तर दिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

सेलिना म्हणाली, ‘गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबाला मिळणाऱ्या प्रसिद्धिली प्रत्साहन दिलं जात होतं. ज्यामध्ये मॅगझिन कव्हर, मुलाखती आणि कुटुंबासंबंधी अनेक लेख असायचे. पण आता जेव्हा मी माझ्या खासजी व्यथा, कायदेशीर संघर्ष आणि एक आई म्हणून माझी चिंता यांबद्दल बोलू लागली, तर मला याचं उत्तर देण्याऐवजी नोटीस बजावण्यात आली. ती माझी देखील मुलं आहे… मी त्यांची आई आहे आणि यासाठीच मी माझी लढाई सुरु ठेवणार आहे…’

सेलिनाला हवी आहे ज्याइंट कस्टडी…

सेलिना पुढे म्हणाली, ‘मी कायम ज्वाइंट कस्टडी आणि परस्पर सहमतीने घटस्फोटाची मागणी केला. मी अनेकदा शांततेत मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण कोर्टाकडून ऑर्डर असताना देखील मला माझ्या मुलांना भेटू दिलं जात नाही. सतत मला माझ्या मुलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.’
पीटर हॉग आणि त्यांच्या वडिलांनी यापूर्वी पाठवलेल्या कायदेशीर नोटिसांमध्ये म्हटलेलं, या प्रकरणातील सार्वजनिक आरोपांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे आणि त्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो. मात्र सेलिना जेटली हिचा दावा आहे की, हा अभिनेत्रीला बदनाम करण्याचा, धमकावण्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी देखील अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केलेली ज्यामध्ये ती मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसली.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in