• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घटती लोकसंख्या भारतापुढे मोठे आव्हान, जगातील तज्ज्ञांमध्ये चिंता, वृद्ध..

June 9, 2026 by admin Leave a Comment


भारतात झपाट्याने लोकसंख्या घटताना दिसत आहे. जन्मदर कमी झाला. भारतात जन्मदर कमी झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात ज्या पद्धतीने लोकसंख्या घटत आहे, तो मुद्दा आता जगभरात चर्चेत आहे. एलॉन मस्क यांनीही थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतातील घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असून ते टेस्काचे मालक आहेत. त्यांनी भारतातील जन्मदर कमी आणि घटती लोकसंख्या याबाबत चिंता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती. नमुना नोंदणी प्रणाली SRS मधून सरकारी आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये जन्मापासून ते मृत्यू इत्यादी सर्व गोष्टींची नोंद होते. सर्व गोष्टींची नोंदणी येथे ठेवली जाते.  2024 च्या नमुना नोंदणी प्रणालीच्या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर म्हणजेच TFR आता 1.9 वर पोहोचले आहे. याचा अर्थ असा की, देशातील प्रत्येक स्त्रीला सरासरी 1.9 मुले होत आहेत.

जेव्हा एकूण प्रजनन दर TFR 2.1 असतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की लोकसंख्या सध्याच्या पातळीवरच राहते. याला प्रतिस्थापन पातळी म्हणतात. आता भारतात याचा दर खूप जास्त कमी होत आहे. म्हणजेच भविष्यात तरूणांची संख्या अत्यंत कमी आणि वयस्कर लोकांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण होते, ज्याचा वाईट परिणाम देशावर होतो.

जर एखाद्या जोडप्याला दोन मुले असतील, तर त्यांच्या मृत्यूनंतर ती लोकसंख्येमध्ये त्यांच्या पालकांची जागा घेतील. त्यामुळे, लोकसंख्या तीच राहील. मात्र, तसे होत नाहीये. जन्मदर मोठ्या प्रमाणात घटला आहे. विविध कारणांमुळे अनेक बाळे जन्मानंतर जगू शकत नाहीत. आजही जन्मलेल्या मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी यांची संख्या तंतोतंत समान नसते.

त्यामध्येच आता लहान कुटुंब यावर लोकांचा भर वाढला आहे. एक मुलगा किंवा मुलगी असेल तरीही लोक समाधान मानत आहेत. त्यामुळे भारतात सातत्याने लोकसंख्या घटताना दिसत आहे. भारतातील घटती लोकसंख्या जगाकरिता चिंतेचे विषय आहे. अनेक तज्ञ यावर बोलताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in