• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गौतमी पाटील म्हटलं की गाणं हिट, भाऊ कदमसोबतच नवीन गाणं प्रचंड व्हायरल, होतंय प्रचंड कौतुक

June 6, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांची गाणीही आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अंजनीच्या सुता’, ‘चंदनाच्या पाटावर’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ यांसारख्या अनेक गाण्यांनी महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे. अशाच दादा कोंडके यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गाण्यांपैकी एक असलेल्या ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याचा नवा अवतार आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या गाण्याला आधुनिक संगीत आणि नव्या सादरीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या गाण्यात महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहे.

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले असून, हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला वेगळे आकर्षण लाभले आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे या गाण्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

म्युझिक व्हिडीओमध्ये गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांनी विविध आकर्षक लूक साकारले आहेत. सुरुवातीच्या सीनमध्ये गौतमी पाटील लाल रंगाच्या पारंपरिक नऊवारी साडीत दिसत आहे तर पुढील काही सीनमध्ये दोघेही काळ्या वेशभूषेत, रेट्रो स्टाईल आणि वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या लूकसोबतच दोघांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

गाण्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

गाण्याच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदम हिने देखील या गाण्याचे कौतुक करत, गाणं खूप आवडलंय… Loved It! खूप मस्त. मी कधी एकदा या गाण्यावर डान्स करतेय असं झालंय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीही या नव्या जोडीचे आणि गाण्याच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला, दोघांनीही जबरदस्त डान्स केला आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in