• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? बोलता बोलता काय सांगितलं?

June 28, 2026 by admin Leave a Comment


मधल्या काळात अभिनेता गोविंदाला गोळी लागली होती. घरात बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती लागल्याचं गोविंदाने म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवस या प्रकरणाची चर्चा रंगली आणि मामला थंड बस्त्यात गेला. पण परत एकदा गोंविदाला लागलेल्या गोळीचा आवाज घुमू लागला आहे. गोविंदाची बायको सुनीता आहुजा यांनी असं काही सांगितलं की चर्चा व्हायला लागली. सुनीताच्या एका विधानाने तिनेच तर गोंविदावर गोळी झाडली नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सुनीता आहुजा रिअलिटी शो लॉक अप : सच या सजा या शोमध्ये आली होती. यावेळी तिने लग्न, नात्यातील तणाव आणि गोविंदाच्या अफेयरबाबत अनेक खुलासे केले. तिने आपल्या वैवाहिक जीवनाबाबत सांगताना गोविंदाचे असंख्य अफेयर होते, असा गौप्यस्फोट केला आहे. या शोच्या प्रीमियर एपिसोडची होस्ट होती फराह खान. तिने सुनीताला बोलतं केलं. तसेच सुनीता आहुजाशी संबंधित काही बातम्यांच्या हेडलाइन्स तिला वाचवून दाखवल्या. त्यातील एक हेडलाईन अत्यंत रोचक होती. ती म्हणजे, मला गोविंदा सारखा मुलगा हवा, नवरा नाही. सुनीताने असं मागे म्हटलं होतं. तेच तिला परत वाचवून दाखवण्यात आलं.

तरीही साथ दिली

ही हेडलाईन वाचवून दाखवताच त्यावर सुनीताने तिचं मत व्यक्त केलं. प्रेमात तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहन करावी लागते. गोविंदाने त्याच्या आयुष्यात असंख्य लफडी केली. इंडस्ट्रीत अशा गोष्टी सामान्य असतात. पण तरीही मी इतकी वर्ष चीची (गोविंदा)ला साथ दिली. मला वाटतं त्याच्या सारखा मुलगा असायला हवा, असं सुनीता म्हणाली.

त्या दिवशी मी…

त्यानंतर सुनीताला अजून एक हेडलाईन वाचून दाखवण्यात आली. को होस्ट रितेश देशमुखने तिला ही हेडलाईन वाचवून दाखवली. जेव्हा नवरा-बायको एकत्र असतील तर अंखियों से गोली मारे. पण थर्ड पार्टी आल्यावर गुडघ्यावर गोली मारे… अशी हेडिंग दिला वाचवून दाखवली. त्यावरही सुनीताने मजेदार उत्तर दिलं. ऐकलंस का चीची. एकून घे. गुडघ्यावर गोळी तेव्हाच लागते, जेव्हा कोणी लाइफमध्ये येतं. तेही मी खोटं नाही सांगितलं. माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. मीच गोळी मारली असंही सांगितलं गेलं. ही घटना घडली, तेव्हा मी मुंबईत नव्हते. मी खाटू श्याम मंदिरात गेले होते, असा खुलासा तिने केला.

गोविंदा आणि सुनीता आहूजाचं लग्न 1987मध्ये झालं होतं. दोघांनीही आपल्या लग्नाचं गुपीत दोन वर्ष ठेवलं. टीना आहूजाच्या जन्मानंतर त्यांनी दोघांचं लग्न झाल्याचं जाहीर केलं. त्यांचा एक मुलगाही आहे. यशवर्धन आहूजा त्याचं नाव आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in