• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोवा ते नेपाळ मोफत प्रवास, फ्लाईटपासून जेवण-हॉटेलपर्यंत सर्व मोफत, या सरकारी योजनेत करा अर्ज

June 1, 2026 by admin Leave a Comment


गोवा ते नेपाळपर्यंतच तिर्थ यात्रा करायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भन्नाट योजना आखण्यात आली आहे. या योजने अंतर्गत या वर्षी ५६ हजार प्रवाशांना तीर्थ यात्रेसाठी मोफत नेले जाणार आहे. यात ५० हजार प्रवाशांना एसी रेल्वे द्वारे नेले जाणार आहे. तर उरलेल्या ६ हजार प्रवाशांना विमानाने नेले जाणार आहे. या राज्याच्या या तिर्थ यात्रेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. या यात्रेत देशाती अनेक तिर्थ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

राजस्थान सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी या तिर्थ यात्रेचे आयोजन केले आहे.या यात्रेसाठी अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहेत. इच्छुक ज्येष्ठ नागरिक १० जूनपर्यंत  या यात्रेसाठी अर्ज करु शकतात. उदा. ५ जून रोजी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व यात्रा’ अंतर्गत जयपूरहून एक ट्रेन रवाना केली जाणार आहे. या ट्र्रेनद्वारे प्रवाशांना द्वारका, नागेश्वर तसेच सोमनाथचे दर्शन घडवले जाणार आहे. या प्रकारे सरकारच्या वतीने रामेश्वरपासून ते नेपाळच्या पशुपतीनाथ पर्यंत तिर्थाटन घडवले जाणार आहे. चला, तर या योजनेतुन नेमके कोण-कोणत्या तिर्थस्थळांचे दर्शन घडवले जाणार आहे. याचे नियम आणि अटी काय आहेत हे पाहूयात…

कोण जाऊ शकते ?

यात्रेस केवळ ६० वर्षांहून अधिक वयाचे लोकच जाऊ शकतात, १ एप्रिल २०२६ रोजी वयाची साठी पूर्ण झालेली पाहिजे. पती आणि पत्नी एकाच अर्जात या मोफत यात्रेसाठी नाव नोंदवू शकतात. जर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे वय ७० हून जास्त आहे. तर सोबत एक अटेंडन्ट देखील घेऊन जाऊ शकता. याचा खर्चही सरकार करणार आहे.

कसा लागतो नंबर ?

या योजनेंतर्गत जर तुम्हालाही प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करावा लागेल. त्यानंतर लॉटरीद्वारे नंबर काढण्यात येणार आहे. जर तुमचा नंबर या लॉटरीत आला तर तुम्हाला या यात्रेत जाण्याची संधी मिळणार आहे.

कोणत्या ठिकाणी तिर्थाटन ?

एसी ट्रेनने कुठे नेले जाणार ?

हरिद्वार-ऋषीकेश-अयोध्या-वाराणसी-सारनाथ

सम्मेदशिखर-पावापुरी-वाराणसी-सारनाथ

मथुरा-वृंदावन-बरसाना-आग्रा-अयोध्या

द्वारकापुरी-नागेश्वर-सोमनाथ

तिरूपती-प‌द्मावती

कामाख्या-गुवाहाटी

गंगासागर-कोलकाता

जगन्नाथपुरी-कोणार्क

रामेश्वरम-मदुरई

वैष्णोदेवी-अमृतसर-वाघा बॉर्डर

गोव्याचे मंदिर तसेच अन्य स्थळ चर्च

उज्जैन-ओंकारेश्वर-त्र्यंबकेश्वर-घृष्णेश्वर-एलोरा

बिहार-शरीफ, पाटणा साहेब, पाटणा बिहार,

श्री हजूर साहेब नांदेड, महाराष्ट्र

विमानाने पशुपतीनाथ (काठमांडू), नेपाळची यात्रा घडविली जाणार आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in