• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गॅस कनेक्शनसाठी सरकारचा नवा नियम; आणलं ट्रान्सफर व्हाऊचर, कसा वापर करावा?

May 26, 2026 by admin Leave a Comment


LPG And PNG Connection : देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीय कुटुंब, भाड्याने राहणारे, नोकरी करणारे, नेहमी स्थलांतर करणारे यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शन असणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा आदेश, 2026 अधिसूचित केला आहे. या आदेशाअंतर्गत सामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. आजकाल अनेक लोक पीएनजी कनेक्शन घेत आहेत. घरात पाईपलाईनद्वारेच गॅसचे कनेक्शन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा ग्राहकांना सरकारने दोन पर्याय दिले आहेत.

लोकांपुढे असतील दोन पर्याय

सरकारच्या नियमानुसार अगोदर ज्या लोकांकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांच्याकडे एकूण दोन पर्याय असतील. यातील पाहिला पर्याय म्हणजे ज्या ग्राहकाकडे पीएनजी कनेक्शन चालू आहे, ते तीस दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन पूर्णपणे बंद करू शकतात. तसा अर्ज ते आपल्या गॅस एजन्सीकडे करू शकतात. तर दुसरा पर्याय हा ट्रान्सफर व्हाऊचरचा आहे.

अनेक लोक एलपीजी कनेक्शन बंद करा असा अर्ज करतात

एखाद्या ग्राहकाकडे पीएनजी कनेक्शन आहे आणि त्याला आपले एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शनही बंद करायचे नाही, अशा ग्राहकांसाठी ट्रान्सफर व्हाऊचर चांगला पर्याय आहे. तुम्ही ट्रान्सफर व्हाऊचरसाठी अर्ज केल्यास तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन बंद होणार नाही. अनेक लोक महागरात राहायला गेल्यानंतर पीएनजीचे कनेक्शन घेतात. अशा वेळी ते अगोदर असलेले एलपीजी कनेक्शन बंद करावे असा अर्ज करतात. परंतु भविष्यात या लोकांना पुन्हा छोट्या शहरात किंवा गावात शिफ्ट होण्याची वेळ येते. अशा वेळी पुन्हा गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेणे जिकरीचे होऊन जाते.

ट्रान्सफर व्हाऊचर मदतीला येणार

भविष्यात अशी स्थिती येऊ नये म्हणून ट्रान्सफर व्हाऊचरचा पर्याय आहे. तुम्ही छोट्या शहात शिफ्ट झाले आणि त्या भागात पीएनजी कनेक्शनचा पर्याय नसेल तर तुम्हाल या ट्रान्सफर व्हाऊचरच्या मदतीने लगेच पुन्हा गॅस सिलिंडरचे कनेक्शन मिळेल. तुम्हाला जास्त धावपळ करण्याची गरज नसेल. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या पर्यायाचे स्वागत केले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
  • Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
  • WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in