• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अनिल देशमुख यांनी थेट केले मोदींचे स्वागत..

August 11, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला दिवसभर देशातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह देखील उपस्थित होते. स्टेजवर जाऊन पूर्ण पवार आणि सुळे कुटुंबासोबत फोटो घेताना नरेंद्र मोदी दिसले. शरद पवार यांच्या बाजूला बसून नरेंद्र मोदी आणि अमित शाह गप्पा मारताना दिसले. राहुल गांधीही आपल्या पूर्ण कुटुंबासोबत या रिसेप्शनला पोहोचले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतेही या रिसेप्शनला उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना राज्यातील नेते दिसले. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणारे नेते सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत.

गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणारे अनिल देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. अनिल देशमुखांवर दरमहिन्याला 100 कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप झाला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आता तेच अनिल देशमुख नरेंद्र मोदी यांचे स्वागत सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये करताना दिसले. नरेंद्र मोदी यांना घेण्यासाठी जयंत पाटील गेल्याचे व्हायरल व्हिडीओवरून दिसत आहे. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदींचे केले स्वागत…

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज ते पंतप्रधानांच्या स्वागताला… #SharadPawar #PMModi #NCP #BJP pic.twitter.com/h32ffF4X6o

— Ramraje Shinde (@ramraje_shinde) August 11, 2026

तेच पंतप्रधानांच्या स्वागताला उभे दिसले. राज्यातील जवळपास नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी लावली. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे लग्न मुंबईत अत्यंत खास पद्धतीने पार पडले. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन ठेवण्यात आले. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने बडे नेते दिल्लीतच आहेत. जवळपास नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी लावली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण ! 61 वर्षांपूर्वीचं गीत आजही तितकंच लोकप्रिय
  • मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
  • समलैंगिक डेटिंग ॲपवरून झाली ओळख, भेटीसाठी घरी आला अन् लाखोंचा गंडा… डोंबिवलीत नेमकं काय घडलं ?
  • मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in