• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुलाबाने बेड सजवला, फुग्यांची सजावट, थेट रेल्वेच्या डब्यातच हनिमून; संभाजीनगर-जालना प्रवासाची एकच चर्चा!

July 8, 2026 by admin Leave a Comment


आजकाल जगभरात घडणाऱ्या घटना या काही सेकंदात सोशल मीडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार कळतात. सोशल मीडियाचे जाळे मजबूत झाले आहे की काहीही घडले की लोक मोबाईल काढून व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एसी कोचमधील डब्बा हनिमूनसाठी सजवण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे भारतीय रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्याला ‘हनीमून सूट’ बनवल्याची चर्चा जोरात रंगली आहे. या डब्यात फुगे, फुलांची सजावट, हजारो गुलाबाच्या पाकळ्या आणि भिंतीवर “I Love You” असा संदेश लावण्यात आला होता. रेल्वे चालू असतानाच डबा पूर्णपणे रोमँटिक वातावरणात सजवण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या भव्य आणि रोमँटिक कामगिरीचे कौतुक केले आणि विशेष प्रसंग साजरा करण्याचा हा एक सुंदर मार्ग असल्याचे म्हटले. तर काहींनी रेल्वेच्या डब्यात अशा भव्य सजावटीला परवानगी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. अनेकांनी सुरक्षा, स्वच्छता आणि फुगे, कागद, फुले यासारख्या सजावटीमुळे आग लागण्याचा धोका किंवा रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे का? याबाबत चिंता व्यक्त केली.

A First AC coach has reportedly been decorated with a “honeymoon-style” setup.

The Railway administration must explain: is it’s allowed? @RailMinIndia @RailwaySeva @AshwiniVaishnaw @PMOIndia pic.twitter.com/ofE4AGawJH

— The Nalanda Index (@Nalanda_index) July 7, 2026

सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी या डब्याला मजेदार नावे दिली आहेत. जसे की “सुहागरात एक्सप्रेस” किंवा “Honeymoon on Wheels”. यावर भरपूर मीम्स आणि जोक्स देखील व्हायरल होत आहेत. या व्हायरल क्लिपमुळे ही सजावट रेल्वे प्रशासनाने मंजूर केली होती का आणि कोणाच्या परवानगीने ही व्यवस्था करण्यात आली, असा प्रश्न देखील उपस्थित झाला. अनेकांनी भारतीय रेल्वेला स्पष्ट करावे की, आरक्षित डब्यात खासगी सजावट करण्यास परवानगी आहे का? असे आवाहन केले.

रेल्वे प्रशासनाने काय उत्तर दिले?

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात कोणतेही नियम मोडले गेले नाहीत. प्रवाशाने फर्स्ट एसी डब्यातील दोन्ही बर्थ बुक केल्या होत्या, त्यामुळे तो डबा पूर्णपणे खासगी वापरासाठी आरक्षित होता. सजावटीमुळे रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान झाले नाही किंवा गाडीच्या कामकाजात अडथळा आला नाही. अशा प्रकारच्या सजावटीवर स्पष्ट बंदी घालणारा कोणताही नियम नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सजावट कंपनीचे स्पष्टीकरण

NDTV शी बोलताना महाराष्ट्रातील ‘राहत रूम डेकोरेशन’ या कंपनीने सांगितले की, जालना येथील एका जोडीसाठी हा डबा बुक करण्यात आला होता. जोडीने औरंगाबादहून जालना रेल्वे स्टेशनपर्यंत गाडीने प्रवास केला, त्यावेळी आमच्या टीमने आधीच डब्याची सजावट केली. नंतर जोडीने जालना स्टेशनवरून गाडी पकडली. सजावटीसाठी रेल्वेकडून कोणतीही विशेष परवानगी घेण्यात आली नव्हती, असे कंपनीने सांगितले.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in