• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुगलच्या या एआय फीचरच्या मदतीने काही मिनिटांतच तुमचा ब्लर फोटो बनवा अनब्लर

June 10, 2026 by admin Leave a Comment


आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. स्मार्टफोन हातात असला की आपण लहान-मोठे क्षण फोटो काढतो. अशातच आपण जेव्हा एखादा खास फोटो पाहतो तेव्हा त्यातील काही फोटो ब्लर आलेले असतात, आणि हे फोटो आपल्याला डिलीट करावे लागतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणतेही ब्लर फोटो डिलीट करण्याची गरज नाही. कारण गूगल फोटोज ॲपमध्ये ‘फोटो अनब्लर एआय’ नावाचे एक टूल आहे ज्यात तुम्ही जुने आणि नवीन फोटो जे ब्लर झालेत नीट दिसत नाहीये असे फोटो काही मिनिटांतच या टुल्सच्या मदतीने अनब्लर करू शकता. हे फीचर फोटोमधील ब्लरपणा कमी करण्यासाठी आणि तो अधिक चांगला बनवण्यासाठी एआयचा वापर करते. काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे अविस्मरणीय फोटो पुन्हा नवीन करू शकतात.

फोटो अनब्लर म्हणजे काय?

गूगल फोटोज ॲपमधील ‘फोटो अनब्लर’ हे एक एआय-आधारित वैशिष्ट्य आहे, जे विशेषतः ब्लर झालेले फोटो सुधारण्यासाठी तयार केले आहे. अनेकदा फोटो काढताना आलेला कमी प्रकाश, कॅमेरा हलणे किंवा एखादी हलणारी गोष्टीचा फोटो काढताना अनेकदा ब्लर क्लिअर येत नाही. अशा परिस्थितीत, हे टूल फोटो अनॅलाईस करते आणि त्याची क्वॉलिटी सुधारण्याचा प्रयत्न करते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त नवीन फोटोंपुरते मर्यादित नाही तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील सुधारू शकतात. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींना स्पष्ट आणि आकर्षक स्वरूपात पुन्हा जिवंत करण्यासाठी या टूलचा वापर करू शकता.

एआय आणि मशीन लर्निंग अशा प्रकारे काम करतात

गुगलचे ॲडव्हांस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी पुर्णपणे ‘फोटो अनब्लर’ फीचरला शक्ती देते. जेव्हा तुम्ही हे टूल एखाद्या अस्पष्ट फोटोवर वापरता, तेव्हा बॅकएंडमधील एआय त्या फोटोचे पिक्सेल स्कॅन करते. हे टूल फोटोमधील चेहरे, पार्श्वभूमी आणि वस्तूंमधील अपूर्णता ओळखते आणि त्यांना पुन्हा तयार करते, ज्यामुळे अस्पष्टता किंवा थरथरणे पूर्णपणे नाहीसे होते. सुरुवातीला, हे प्रीमियम फीचर फक्त गुगलच्या पिक्सेल स्मार्टफोन्ससाठी (गुगल पिक्सेल सिरीज) उपलब्ध होते, परंतु आता गुगलने त्याची व्याप्ती वाढवली आहे. आता, हे फीचर गुगल फोटोज ॲपद्वारे इतर अनेक अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध आहे, मात्र यासाठी काही अटी व शर्ती लागू आहेत.

फोटो अनब्लर कसे वापरावे

जर तुम्हालाही एखादा ब्लर फोटो अनब्लर करायचा असेल, तर ही प्रक्रिया खूप सोपी असून त्यात फक्त काही स्टेप्सचा समावेश आहे.

  • यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल फोटोज’ ॲप उघडा.
  • यानंतर तुमच्या गॅलरीमधून ब्लर फोटो निवडा जो तुम्हाला अनब्लर करायचा आहे.
  • फोटो उघडल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या ‘एडिट’ पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • एडिट सेक्शनमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे टूल्स दिसतील, जिथे तुम्हाला ‘टूल्स’ टॅबवर जावे लागेल.
  • टॅब केल्यावर त्यात तुम्हाला ‘अनब्लर’चा एक पर्याय दिसेल.
  • तुम्ही अनब्लरवर क्लिक करताच, गुगलची एआय प्रणाली आपोआप तुमच्या फोटोवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करेल.
  • प्रोसेसिंग दरम्यान ॲप तुम्हाला एक स्लायडर देईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोटोमधील ब्लरपणा कमी-जास्त करू शकता.
  • फोटो किती अनब्लर दिसतोय हे पाहण्यासाठी तुम्ही स्लायडर पुढे-मागे सरकवू शकता.
  • जेव्हा तुम्हाला वाटेल की फोटो पूर्णपणे स्पष्ट झाला आहे, तेव्हा “Done” किंवा खाली असलेल्या टिक मार्कवर क्लिक करा.
  • त्यानंतर हा नवीन अनब्लर फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरील “Save Copy” पर्यायावर टॅप करा.

चांगली गोष्ट ही आहे की असे केल्याने तुमचा मूळ ब्लर असलेला फोटो कधीच डिलीट होत नाही; फक्त त्याची एक नवीन कॉपी तयार होते. यामुळेच वापरकर्ते कोणत्याही जोखमीशिवाय त्यांच्या जुन्या किंवा ब्लर फोटोंवर हे फीचर वापरून पाहू शकतात. ज्यांना त्यांचे अविस्मरणीय फोटो अधिक चांगले बनवायचे आहेत, त्यांच्यासाठी हे टूल एक अतिशय उपयुक्त आणि सोयीस्कर पर्याय ठरू शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in