
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील गिरगाव येथील एका हॉटमध्ये देह व्यापारात गुंतलेल्या मराठी अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. एका रात्रीसाठी अभिनेत्रीने लाखो रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. या अभिनेत्रीला यामध्ये जबरदस्ती ढकलल्याचे समोर आले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पोलिसांनी गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकली होती. या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. धाड टाकली असता पोलिसांनी दोन अभिनेत्रींसह दलाल म्हणून काम करणाऱ्या महिला मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडले आहे.
सुरुवातीला पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून पहिले खात्री करुन घेतली. नंतर एक महिला मेकअप आर्टिस्ट दोन अभिनेत्रींना घेऊन हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि मराठी अभिनेत्रीची यातून सुटका केली.
मेकअप आर्टिस्ट सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे. ती आणखी कोणत्या अभिनेत्रींच्या संपर्कात आहे? याची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणात अडकलेली मराठमोळी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु गोपनियतेच्या कारणामुळे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव कुठेही उघड करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आलेले आहे.




Leave a Reply