• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाडीच्या मागे आले, धाडधाड गोळ्या झाडल्या… काँग्रेस नेत्याची भयंकर हत्या

August 30, 2026 by admin Leave a Comment


एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बड्या काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काँग्रेसचा नेता बाईकवर आपल्या मित्रासोबत जात होते. दरम्यान, अचानक एक कार आली आणि त्यांचा पाठलाग करु लागली. संधी मिळताच कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी धाडधाड गोळ्या झाडल्या. नेत्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

ही घटना पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील ममडोटमधील काँग्रेसच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नगरसेवक गुरप्रीत सिंह गोपी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. तसेच पोलिस-प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्याला लक्ष्य करून अशा प्रकारे हत्या करणे अनेक प्रश्न निर्माण करते. तरीही, या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी मोहीम तीव्र करण्याची घोषणा केली आहे.

कशी आणि कधी झाली घटना

मीडिया अहवालानुसार, पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील ममडोट गावात काँग्रेसचे नगरसेवक गुरप्रीत सिंह गोपी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येची घटना शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, शस्त्रधारी हल्लेखोरांनी बाईकवरून जाणाऱ्या गोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कारने पाठलाग केला. संधीसाधून रस्त्यात त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यात गोपी यांचा जागेवरच मृत्यू झाला. फिरोजपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) भूपिंदर सिंह सिद्धू यांनी सांगितले की, घटनेमागे दोन्ही पक्षांमधील जुना वाद होता. तपासात निवडणुकीशी संबंधित वादही हल्ल्याचे एक प्रमुख कारण म्हणून पाहिले जात आहे.

बाईकवरून जात होते, कारने पाठलाग केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपी आणि हरप्रीत नावाची व्यक्ती बाईकवरून कुठे जात होते. त्यांचे काही मित्र एका वेगळ्या कारमधून मागून येत होते. आरोप आहे की, हल्लेखोरांनी प्रथम बाईकचा पाठलाग केला आणि नंतर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी मागे येणाऱ्या कारवरही गोळीबार केला. एसएसपी यांनी सांगितले की, हल्लेखोरांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या अटकेसाठी पोलिसांच्या अनेक टीम्स स्थापन करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. पोलिसांनुसार, मुख्य आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आहे आणि तो कथितपणे बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in