• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गश्मीर महाजनीचा ‘ॲनिमल’ अवतार; ‘राखणदार’ची जोरदार चर्चा, सई ताम्हणकरची कोणती भूमिका?

August 10, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणेसोबतच या चित्रपटाचं पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टरमधील रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण आणि गूढ कॅप्शनमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, गश्मीर महाजनी आणि मकरंद अनासपुरे ही दमदार स्टारकास्ट प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘राखणदार’ या चित्रपटाचं पहिले पोस्टरही तितकंच लक्षवेधी आहे. लालभडक पार्श्वभूमीवर रक्ताचे उडालेले शिंतोडे, मध्यभागी सिंहाच्या उग्र आणि डरकाळी फोडणाऱ्या चेहऱ्याची प्रतिमा, तर त्याखाली मजबूत देहयष्टी असलेली व्यक्तिरेखा दिसते. पोस्टरमधील सिंहाची प्रतिमा सामर्थ्य, धैर्य आणि रक्षणाची भावना अधोरेखित करते. ठळक अक्षरांमध्ये साकारलेलं ‘राखणदार’ हे शीर्षक चित्रपटाच्या भव्यतेची आणि दमदार आशयाची स्पष्ट झलक देते. याच पोस्टरवर लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेलं ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’ हे कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. या एका वाक्यामुळे पोस्टरभोवतीचं गूढ आणखी वाढलं असून ही वडील- मुलाच्या नात्याची गोष्ट आहे का, पोस्टर इतकं रक्तरंजित का आहे, सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

पहा पोस्टर-

 

View this post on Instagram

 

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

आपल्या नव्या वाटचालीबद्दल गश्मीर महाजनी म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारी असावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे या पोस्टरमधील प्रत्येक एलिमेंट अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. पोस्टर पाहाताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यावं, हा त्यामागचा उद्देश आहे. या पोस्टरमधील प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक तपशील कथेशी जोडलेला आहे. हा चित्रपट मी मनापासून माझ्या बाबांना समर्पित करत आहे.” प्रेक्षकांमध्ये आतापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..
  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in